शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणा : ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:27 IST

भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याच्या मागणीच्या ठरावासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तालुका अध्यक्ष विनायक सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृहात कॉँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.

ठळक मुद्देसिन्नर : तालुका कॉँग्रेस कमिटीच्या बैठकीत घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय

सिन्नर : तालुक्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याच्या मागणीच्या ठरावासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तालुका अध्यक्ष विनायक सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृहात कॉँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.भ्रष्टाचारी अधिकाºयांमुळे सर्वसामान्य माणसांचे काम मार्गी लागणे मुश्कील झाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अशा भ्रष्टाचारी अधिकाºयांचा बंदोबस्त जिल्हास्तरीय अधिकाºयांनी तत्काळ करावा, असा ठराव या बैठकीत करण्यात आला. या आशयाचे पत्र राज्याचे महसूलमंत्र्यांना पाठवण्यात येणार असून, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून छगन भुजबळ यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.सिन्नर तालुक्यातील जिल्हा काँग्रेस कमिटीमधील सर्व सदस्य बरखास्त करून नवीन सदस्यांची शिफारस बैठकीत करण्यात आली. प्रामुख्याने तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष सुदाम सांगळे, राजाभाऊ गोळेसर यांच्यासह ज्येष्ठांना जिल्हा काँग्रेस कमिटीवर घेण्यात यावे, अशी शिफारस यावेळी करण्यात आली. सिन्नर शहरांमध्ये पाण्याचे नियोजन कोलमडले असून, नगर परिषदेतील सत्ताधाºयांनी नियोजन करावे. आजी व माजी आमदारांनी मतभेद बाजूला ठेवून नगर परिषदेची पाणी योजना पूर्णत्वास नेऊन उपाययोजना करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली.या बैठकीस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनायक सांगळे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष मुजाहिद खतीब, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश चोथवे, सिन्नर तालुका महिला अध्यक्ष मीना देशमुख, शहर महिला अध्यक्ष रत्नमाला मोकळ, तालुका समन्वय उदय जाधव, अश्फाक शेख, सिन्नर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष भाऊसाहेब शेळके, बाळासाहेब गोरडे, संतोष जोशी, जाकीर भाई शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.नुकसानभरपाईची मागणीअवकाळी पावसामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सरकारने आदेश देऊनही व्यवस्थित पंचनामे न करता थातूरमातूर पद्धतीने सरकारला प्रस्ताव पाठविले आहेत. संपूर्ण शेतकºयांना योग्य प्रमाणात नुकसानभरपाई मिळाली नसून त्यांना लवकरात लवकर भरपाई मिळावी, असा ठरावही बैठकीत करण्यातआला.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण