शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महासभेचा ठराव रखडल्याने विकासनिधीच्या कामांना ब्रेक

By admin | Updated: August 24, 2016 01:33 IST

दिरंगाई : प्रशासनाला अंदाजपत्रकाची प्रतीक्षा

नाशिक : सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी महापालिकेचे अंदाजपत्रक स्थायी समितीने महासभेला सादर करून दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप महासभेने मंजूर केलेला ठराव प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. महासभेचा ठराव रखडल्याने प्रत्येक नगरसेवकासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेल्या विकासनिधीतील कामांनाही ब्रेक लागला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उर्वरित काळात प्रभागातील कामांसाठी नगरसेवकांनी मात्र प्रशासनाकडे तगादा लावला आहे.सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी आयुक्तांनी दि. २६ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीला १३५७.९६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यावर स्थायी समितीने ३८० कोटींची वाढ सुचविल्याने अंदाजपत्रक १७३७.९६ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले.स्थायी समितीने अंदाजपत्रकात नगरसेवक निधी ६० लाख रुपये तसेच महापौर निधी म्हणून ३ कोटी, उपमहापौर व स्थायी समिती सभापतीसाठी दोन कोटी, प्रभाग सभापतींसाठी ५० लाख रुपयांच्या विकासनिधीची तरतूद केलेली आहे. स्थायी समितीने आपले अंदाजपत्रक दि. २८ जून रोजी महासभेला सादर केले होते. यावेळी महासभेत अंदाजपत्रकावर पाच तास चर्चा होऊन नगरसेवक निधीतील कामे वेळेवर मार्गी लागतील काय, अशी शंका उपस्थित केली होती. दरम्यान, नूतन आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नगरसेवक निधीबाबत चर्चा सुरू झाली. महापौरांकडे सर्व गटनेत्यांची बैठक होऊन ५० लाख रुपयांचा विकास निधी प्रत्येक नगरसेवकाला मिळावा यावर एकमत झाले. परंतु आयुक्तांकडून ३० लाखांच्यावर निधी देण्याबाबत असमर्थता दर्शविली जात होती. अखेर विकासनिधी ५० लाखांवर आणण्यात आणि त्यासाठी आयुक्तांची संमती मिळविण्यात पदाधिकारी यशस्वी ठरले आहेत. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून महासभेचा ठरावच प्रशासनाला प्राप्त झाला नसल्याने विकासनिधीतील कामांना चालना देण्यात अडथळा उत्पन्न झाला आहे. प्रत्येक प्रभागासाठी ५० लाख रुपयांचा निधी मिळणार असल्याने सुमारे १५ ते २० नगरसेवकांनी लेखा विभागाला कामांची यादीही सादर केली आहे, परंतु ठरावच प्राप्त नसल्याने लेखा विभागालाही फाईल पुढे सरकविणे अडचणीचे बनले आहे. (प्रतिनिधी)