हांडे खूनप्रकरणी दोघे दोषी; २४ साक्षीदार फितूर

By Admin | Updated: January 7, 2017 22:52 IST2017-01-07T22:52:03+5:302017-01-07T22:52:03+5:30

मखमलाबाद रस्त्यावरील उदय कॉलनी परिसरात मार्च २०१४ साली झालेल्या प्रवीण ऊर्फ समीर हांडे खून खटल्यात जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी दोगांना दोषी ठरवले.

Both are guilty of murder; 24 witnesses Fitoor | हांडे खूनप्रकरणी दोघे दोषी; २४ साक्षीदार फितूर

हांडे खूनप्रकरणी दोघे दोषी; २४ साक्षीदार फितूर

>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि ७ -  मखमलाबाद रस्त्यावरील उदय कॉलनी परिसरात मार्च २०१४ साली झालेल्या प्रवीण ऊर्फ समीर हांडे खून खटल्यात जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी सहा संशयित आरोपींपैकी दोघांना दोषी धरले, तर उर्वरित चौघा संशयितांना निर्दोष ठरविले. याबाबत येत्या बुधवारी (दि.११) न्यायालयाकडून शिक्षेप्रकरणी अंतिम निकाल दिला जाणार आहे. 
उदय कॉलनीमध्ये ९ मार्च रोजी मध्यरात्री प्रवीण ऊर्फ समीर हांडे, दुर्गेश गवळी, स्वप्नील पवार हे तिघे गप्पा मारत उभे होते. दरम्यान, सराईत गुन्हेगार तुकाराम चोथे ऊर्फ तुक्या, नीलेश नेरूळकर, किशोर बरू, अमोल चांगले, पप्पू खैरे ऊर्फ विनोद, प्रवीण कुमावत यांनी येऊन स्वप्नीलला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी हांडे याने मध्यस्ती करत भांडण सोडविले. त्यानंतर हांडे आणि स्वप्नीलवरील सहा संशयितांच्या मागे एका शाळेजवळ गेले असता त्या ठिकाणी पुन्हा वादविवाद होऊन स्वप्नील व हांडे यांना संशयितांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी नेरूळकर याने मारहाणीसाठी कमरेचा पट्टा काढला असता त्याच्या कमरेला खोचलेला गावठी कट्टा खाली पडला. यावेळी तुक्याने कट्टा उचलून तो हांडेच्या दिशेने रोखून गोळी झाडली. या गोळीबारात हांडेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी दिली आहे. 
हांडे खून खटल्यानंतर सर्व संशयित फरार झाले होते. पिंगळे हे पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक होते. त्यांनी सर्व संशयितांना आठवडाभरात अटक करून न्यायालयापुढे हजर केले होते. 
 
२८ साक्षीदारांपैकी २४ फितूर
 
या खटल्याप्रकरणी न्यायाधीश उर्मिला फलके - जोशी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकारपक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अजय मिसर यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने या खटल्यात अद्याप एकूण २८ साक्षीदार तपासले; मात्र या साक्षीदारांपैकी २४ साक्षीदार फितूर झाले. तपासी अधिकाºयासह दोन न्यायाधीश आणि डॉक्टर अशा केवळ चार सरकारी साक्षीदारांचा जबाब व पिंगळे यांनी सूक्ष्म तपास करून मिळविलेले कागदपत्रांच्या पुराव्यांआधारे न्यायालयाने या खटल्यात सराईत गुन्हेगार तुक्या व नीलेश यांना दोषी धरले आह

Web Title: Both are guilty of murder; 24 witnesses Fitoor