शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अवैध धंद्यांसाठी रस्ता आरक्षित करा

By admin | Updated: September 21, 2014 00:59 IST

अवैध धंद्यांसाठी रस्ता आरक्षित करा

 

मालेगाव : शहरातील आंबेडकर पूल ते छत्रपती शिवाजी चौकपर्यंतचा रस्ता हा अतिक्रमणधारकांसाठी तसेच अवैध धंदे करणाऱ्यांसाठी आरक्षित म्हणून घोषित करून त्यांना आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी उपहासात्मक मागणी येथील सार्वजनिक नागरी सुविधा समितीतर्फे मनपा आयुक्त अजित जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शहरातील आंबेडकर पुलालगतच्या अवैध व्यवसायांची वस्ती साधारणत: आठ वर्षांपूर्वी मनपा - प्रांत व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम आखून हटविली होती. त्या जागेवरून आंबेडकर पूल ते सांडवा पुलादरम्यान पूर्वभागात रस्ता तयार करण्यात आला होता. या रस्त्यालगत उद्यानही तयार करण्यात आले होते. मात्र कालांतराने येथील परिस्थितीत बदल झाला आहे. सदर रस्त्याच्या दुतर्फा फर्निचर व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. इतर व्यावसायिकांचेही अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. येथील सोडाविक्रीच्या गाड्यांवर सर्रासपणे दारूविक्रीचा धंदा सुरू आहे. चार दिवसांपूर्वी याच गाड्यांवर दारू विक्रीतून हाणामारी होऊन एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. सततचे अतिक्रमण व अवैध धंद्यांनी पुन्हा तोंड वर काढल्याने या भागातून ये - जा करणाऱ्या शहर - तालुक्यातील जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक मनपा व पोलीस प्रशासनही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. याबाबत तक्रार करूनही दोन्ही प्रशासनाकडून उचित अशी कारवाई केली गेलेली नाही. त्यामुळे सदर भाग अतिक्रमणधारक व अवैध धंदे करणाऱ्यांसाठी आरक्षित म्हणून घोषित करावा, अशी उपहासात्मक मागणी सार्वजनिक नागरी सुविधा समितीतर्फे मनपा आयुक्त जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.