शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

सांगवी सोसायटी निवडणुकीत बोगस मतदार

By admin | Updated: January 20, 2017 00:12 IST

देवळा : जिल्हा उपनिबंधकांकडे तक्र ार

उमराणे : देवळा तालुक्यातील सांगवी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक होत असून, सोसायटीच्या मतदार यादीमध्ये ३२ बोगस मतदारांची नावे घेण्यात आली आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बेकायदेशीर मतदारांचा समावेश करण्यात आल्याची तक्रार सोसायटीचे विद्यमान संचालक अभिमन शेवाळे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. सांगवी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक येत्या २९ जानेवारी रोजी होत असून, या निवडणुकीच्या मतदार यादीत नव्याने ३२ सभासदांच्या नावे शेतीक्षेत्र दाखवून त्यांची नावे मतदार यादीत दाखल करण्यात आली आहेत. संबंधित सभासदांच्या शेतीक्षेत्राच्या नोंदी आॅक्टोबर व डिसेंबर या महिन्यात दाखविल्या आहेत. वैद्यनाथ समितीच्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये निवडणुकीपूर्वी किमान दोन वर्षांआधी सोसायटीचे सभासद होणे आवश्यक आहे, तरच त्या सभासदांचा मतदार यादीत समावेश करता येतो. सदर सभासदांना निवडणूक लागण्याआधी फक्त दोन महिन्यांच्या कालावधीत मतदार करून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बेकायदेशीर प्रकार केल्याचा आरोप शेवाळे यांनी केला आहे. याशिवाय संस्थेचे चार वर्षांपासून लेखापरीक्षणही झालेले नाही. दोन वर्षांपूर्वी संस्थेचे सचिव गैरव्यवहारामुळे निलंबित झाले आहेत. सदर प्रकाराची चौकशी होण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांकडे दाद मागण्यात आली असून, जिल्हा उपनिबंधकांनी तालुका निबंधकांकडे याबाबत अहवाल मागविला आहे. दरम्यान, सहायक निबंधकांनी सातबारा, खाते उतारा व नमुना नंबर ६ वरील नोंदीची सत्यता पडताळण्यासाठी तहसीलदारांकडे अहवाल पाठविला आहे.दरम्यान, निवडणूक तोंडावर असताना बोगस मतदारांचा प्रश्न उपस्थित झाल्याने जिल्हा उपनिबंधक काय निर्णय देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)