शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मंडळाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

By admin | Updated: September 30, 2016 02:41 IST

आदिवासी विकास : विष्णू सावरा यांना धरले धारेवर

नाशिक : वार्षिक सर्वसाधारण सभेच्या एक दिवस अगोदर वार्षिक अहवालास घेतलेली मंजुरी, वर्षानुवर्षे उघड्यावर पडणाऱ्या धान्यामुळे होणारे लाखोंचे नुकसान, आदिवासी विकास कार्यकारी संस्थांची दयनीय अवस्था यांसह अनेक प्रश्नांवर आदिवासी विकास महामंडळाच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी संचालक मंडळासह अध्यक्ष तथा आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांना धारेवर धरले.गुरुवारी (दि. २९) नाशिक येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर महामंडळाचे अध्यक्ष आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, संचालक धनराज महाले, देवीदास पाटील, मीनाक्षी वट्टी, जयश्री तळपे, मगन वळवी, विठ्ठल देशमुख, मधुकर काठे, केवलराम काळे, अशोक मंगम, भरतलाल दुधनाग, विकास वळवी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिनकर जगदाळे आदि उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविकात दिनकर जगदाळे यांनी महामंडळाच्या कामकाजाची माहिती दिली. सभासद शंकरलाल मडावी यांनी महामंडळाच्या धान्य खरेदीच्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी केली. जयराम इदे यांनी शासनाकडून आदिवासी सहकारी संस्थांचे शोषण सुरू असल्याचा आरोप करीत आमचे रक्त आटवू नका, असे सुनावले. शिवराम झोले यांनी २०१४ सालीच एका परिपत्रकानुसार आदिवासी सहकारी संस्थांना महामंडळाकडून एक लाख २५ हजाराचा मंजूर केलेला अग्रीम अद्याप दिला जात नाही. त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना केली. रामगोपाल भावस्कर यानी मेळघाट कुपोषणाने कलंकित होत असून, मेळघाटच्या प्रादेशिक कार्यालयाचे स्थलांतर अन्यत्र करू नये, अशी मागणी केली. हरीष गोडेंसह अन्य काही सभासदांनी गोेंदियाचे प्रादेशिक कार्यालय भंडारा येथे असून, ते गोंदियाला करावे, अशी मागणी केली. तुळशीराम बहिरम व रघुनाथ तोकडे यांनी भात पिकाची धान्य खरेदी योजनेतून हमीभाव देऊन खरेदी करण्याची सूचना करतानाच नोकरभरतीतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली. पुंडलिक सहारे यांनी ९६८ आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे कर्जमाफ करण्याची मागणी केली. संचालक धनराज महाले यांनी सभासदांनी केलेल्या मागण्या सोडविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. वित्त व्यवस्थापक नीलेश राजूरकर यांनी अहवाल वाचन केले. (प्रतिनिधी)