शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

विजयी जल्लोषात भगव्यापासून निळा झेंडा दूरच

By admin | Updated: May 17, 2014 00:16 IST

नाशिक : शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे विजयी झाल्यानंतर मतमोजणी केंद्राबाहेर भगवे झेंडे फडकले आणि गुलालाची उधळण झाली. मात्र महायुतीत असूनही, रिपाइंचा झेंडा बाहेर पडला नाही. विजयी जल्लोषात शिवसेनेचे कार्यकर्ते गुलालाने माखले, भगवे ध्वज खांद्यावर मिरवले. त्यात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपाइंचा निळा झेंडा आणि नीळ उडालीच नाही. शिवसेना कार्यालयाबाहेर एकमेव निळा झेंडा फडकला तेवढाच काय तो अपवाद.

नाशिक : शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे विजयी झाल्यानंतर मतमोजणी केंद्राबाहेर भगवे झेंडे फडकले आणि गुलालाची उधळण झाली. मात्र महायुतीत असूनही, रिपाइंचा झेंडा बाहेर पडला नाही. विजयी जल्लोषात शिवसेनेचे कार्यकर्ते गुलालाने माखले, भगवे ध्वज खांद्यावर मिरवले. त्यात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपाइंचा निळा झेंडा आणि नीळ उडालीच नाही. शिवसेना कार्यालयाबाहेर एकमेव निळा झेंडा फडकला तेवढाच काय तो अपवाद.रिपाइंचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले महायुतीतून राज्यसभेवर खासदार म्हणून गेले; मात्र रिपाइंचे स्थानिक पातळीवरील नेते, कार्यकर्ते महायुतीत कितपत रमले हा विषय तेव्हाही चर्चेत राहिला आणि आजही त्याची प्रचितीच आली. आम्ही शिवसेनेसोबतच आहोत असे रिपाइंच्या वतीने वारंवार सांगण्यात आले; मात्र स्थानिक पातळीवर प्रचाराच्या बाबतीत रिपाइंने नेहमीच सावधानतेची भूमिका घेतल्याचे लपून राहिले नाही. त्यातच रिपाइंच्या जिल्हा नेत्यांनी ठामपणे शिवसेनेच्या बाजूने उभे राहण्याचे टाळल्याने शिवसेनेनेदेखील काहीशी नाराजीच दर्शविली होती. त्यामुळे महायुतीत असूनही रिपाइं-सेना यांचे मनोमीलन फारसे अनुभवास आले नाही. विजयी जल्लोषातही आज तोच अनुभव आला. निकाल स्पष्ट होत असताना मतमोजणी कार्यालयाबाहेर सेनेचे कार्यकर्ते भगवे झेंडे आणि गुलालाची उधळण करीत होते. निकाल दृष्टीपथात येताच सेनेचे नेते मतमोजणी केंद्रावर आले; मात्र त्यात रिपाइं नेत्यांचा समावेश नव्हता. मतमोजणी कक्षाबाहेर रस्ते गुलालाने माखले, त्यात नीळ मात्र दिसून आली नाही. शिवसेना कार्यालयाबाहेर रिपाइंचा फलक आणि झेंडा हाच एकमेव अपवाद ठरला. देवळाली कॅम्पमध्ये मात्र रिपाइंच्या नेत्यांनी हेमंत गोडसे यांच्या विजयाचे पेढे वाटून स्वागत केले.