फलकबाजांना अखेर दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 01:34 AM2019-09-17T01:34:02+5:302019-09-17T01:34:23+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रेची संधी साधून शहरात चौकाचौकांत, दुभाजक आणि रस्त्यांवर स्वागताचे फलक लावण्यात आले असून, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्याच नव्हे तर उच्च न्यायालयाचा अवमानदेखील होत आहे.

 Blacksmith finally bang | फलकबाजांना अखेर दणका

फलकबाजांना अखेर दणका

Next

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रेची संधी साधून शहरात चौकाचौकांत, दुभाजक आणि रस्त्यांवर स्वागताचे फलक लावण्यात आले असून, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्याच नव्हे तर उच्च न्यायालयाचा अवमानदेखील होत आहे. यासंदर्भात महापालिकेवर टीकेची झोड उठताच प्रशासनाने एकाच दिवसात तब्बल ७५ फलक हटविले आहेत. मात्र त्यासंदर्भात अवघ्या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या बकालतेत भर घालणारे अजूनही शेकडो फलक ‘जैसे थे’ असून, ते बहुतांशी सत्ताधारी तसेच इच्छुकांचे असल्यानेच प्रशासन हात लावण्यास धजावत नाहीत की काय? असा प्रश्न केला जात आहे.
मुख्यमंत्री नाशिकला दत्तक घेतल्यानंतर शहरात स्वच्छता टापटीप राखण्याची नैतिक जबाबदारी या पक्षाच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांवर असली तरी प्रत्यक्षात मात्र त्याला हरताळ फासण्याचे काम सध्या सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली महाजनादेश यात्रा बुधवारी (दि.१८) शहरात येणार असून, गुरुवारी (दि.१९) त्याचा समारोप होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या इच्छुकांनी हीच संधी साधून जनादेश यात्रा आणि संपूर्ण मतदारसंघात फलक लावले आहेत. अधिकृत होर्डिंग्जशिवाय दुभाजक, रस्त्याच्या कडेला इतकेच नव्हे तर सिग्नल आणि वाहतूक बेटांनादेखील फलकांचा गराडा पडला आहे.
राजकीय कार्यकर्त्यांनी हे फलक अशा जागेवर लावले आहेत की फलक लावल्यानंतर वाहतूक मार्ग न दिसता अपघात होऊ शकतात. परंतु त्याची तमा न बाळगता आजी-माजी आमदार तसेच अन्य इच्छुक आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी फलक लावले आहेत. सोमवारी (दि.१६) राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हेदेखील शहराच्या दौºयावर असल्याने अनेक भागात आणि मुंबई नाका येथेदेखील वाहतूक बेटावर झेंडे आणि फलक लावण्यात आले होते.
या प्रकारामुळे शहरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरात मनपाच्या पूर्व परवानीशिवाय फलक लावू नये असे स्पष्ट निर्देश असतानादेखील आदेश डावलून फलक लावण्यात आले आहेत. महापालिकेनेदेखील उच्च न्यायालयाचे आदेश डावलल्याचा आणि सरकार पक्षावर मेहेरबानी केल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर महापालिकेने काही प्रमाणात फलक हटविण्यास सुरुवात केली. शहरात विविध भागांत ७५ फलक हटविण्यात आले असून, याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नियम डावलून फलकबाजी
महापालिकेत कोणत्याही फलकांच्या उभारणीसाठी परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर त्याचा परवानगी क्रमांक फलकावर लिहावा लागतो. मात्र शहरात उभारलेल्या फलकांवर कोणत्याही प्रकारचे परवानगी क्रमांक लिहिलेले नाही त्यातच महापालिका अपघात घडेल अशा ठिकाणी म्हणजे दुभाजक, सिग्नल झाडावर किंवा वाहतूक बेटावर परवानगी देत नाही मात्र प्रत्यक्षात फलक अशाच ठिकाणी लावले असल्याने नियम डावलून फलक लावल्याचे उघड होत आहे.
महापालिकेने दिवसभरात ३१ फलक हटविले. मुंबई नाका येथून काही फलक जप्त केल्यानंतर पुन्हा काही वेळातच त्याठिकाणी पुन्हा फलक लावण्यात आले. त्यामुळे फलकबाजांनी एक प्रकारे महापालिकेला आव्हान दिले आहे.
आता मुख्यमंत्री
काय करणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या सभेत फलकबाजांना सुनावले होते. फलक लावून उमेदवारी मिळत नाही असे स्पष्ट शब्दात त्यांनी सुनावले होते.
मात्र त्यानंतरदेखील नाशिकमध्ये फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री या फलकबाजांच्या विरोधात
काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे.

Web Title:  Blacksmith finally bang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.