शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

घोरपडेंच्या मालमत्तेवरून काळ्याबाजाराची व्याप्ती

By admin | Updated: November 11, 2015 23:31 IST

रेशन दुकानदार, पुरवठा यंत्रणाही आरोपीच्या पिंजऱ्यात

नाशिक : मोक्कान्वये कारवाई करण्यात आलेल्या संपत घोरपडे याच्या सुमारे पावणे दोनशे कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून रेशनच्या धान्य काळ्याबाजाराची व्याप्ती निदर्शनास येत असल्याने घोरपडे याच्याबरोबरच जिल्ह्यातील रेशन दुकाने व त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेली पुरवठा यंत्रणाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहिली आहे. पुरवठा विभाग, रेशन दुकानदार व काळाबाजार करणाऱ्यांच्या साखळीतूनच हे सारे शक्य असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. नाशिक जिल्ह्यातील रेशनच्या काळाबाजारात घोरपडे व चौधरी अशा दोन टोळ्या असून, या टोळ्यांच्या परस्परविरुद्ध कारवायांतूनच आजवर रेशनच्या धान्याचा काळाबाजार उघडकीस आल्याची उदाहरणे आहेत. त्यातून दोन्ही टोळ्यांवर पोलिसांत गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत; परंतु त्यांची सुनावणी प्रलंबित असल्याने गुन्हेगार मोकाट आहेत. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या बेकायदेशीर व्यवसायातूनच संबंधितांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता गोळा केल्याचे संपत घोरपडे याच्या जप्त मालमत्तेवरून स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर या साऱ्या यंत्रणेवर नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या पुरवठा निरीक्षकापासून ते जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचेही सोयिस्कर दुर्लक्ष त्यास कारणीभूत आहे. त्यामुळे एकटा घोरपडे रेशनच्या धान्य काळ्याबाजारातून कोट्यवधीची मालमत्ता गोळा करू शकतो, तर या साखळीत सहभागी असलेले रेशन दुकानदार, पुरवठा यंत्रणा किती कोटीची भागीदार असेल यावर आता चर्चा झडू लागली आहे. घोरपडे याच्या दृश्य स्वरूपातील मालमत्तेवर टाच आणण्यात आलेली असली तरी, त्यातील न दिसणारी संपत्ती किती असेल, याविषयी अंदाज बांधणे कठीण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. घोरपडे याच्या मुसक्या आवळण्यात आल्यामुळे या धंद्यात गुंतलेल्यांवर दबाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)