शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू?

By admin | Updated: February 26, 2017 00:41 IST

सत्ता समीकरण : अपक्षांनाही गोंजारण्याचा प्रयत्न

नाशिक : जिल्हा परिषदेत निवडणूक निकालानंतर स्पष्ट बहुमत कोणत्याही एका राजकीय पक्षाला न मिळाल्याने आता आघाडी आणि युतीचे पर्याय शोधण्याचे काम भारतीय जनता पक्ष व शिवसेनेकडून सुरू झाले आहे. भाजपाने राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत चर्चेची तयारी सुरू केल्याचे समजते. तर तिकडे शिवसेना नेत्यांनीही मातोश्रीचा कल पाहून प्रसंगी भाजपाशी काडीमोड झाला, तर कॉँग्रेस व राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचे पर्याय खुले ठेवले आहेत.  शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी अपक्षांना सोबत घेण्यासाठी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू केले आहे. भाजपाकडून निवडून आलेल्या एका अनुभवी जिल्हा परिषद सदस्याने शनिवारी (दि.२५) निफाड तालुक्यातून निवडून आलेल्या एका अपक्षासोबत चर्चा केल्याचे समजते. भाजपाकडून निवडून आलेल्या १५ सदस्यांपैकी पाच सदस्य पुरुष, तर दहा महिला जिल्हा परिषद सदस्या निवडून आल्या आहेत.  या पाच पुरुष सदस्यांमध्ये मालेगावमधून जगन्नाथ हिरे व समाधान हिरे, चांदवडमधून डॉ. आत्माराम कुंभार्डे, निफाडमधून डी. के. जगताप व बागलाणमधून कान्हू गायकवाड यांचा समावेश आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघातून सातपैकी पाच जिल्हा परिषद सदस्य भाजपाकडून निवडून आणून हिरे बंधूंनी सरशी साधली असून, या पाचपैकी एका तरी सदस्याला सभापतिपद मिळवून देण्यासाठी ते आता प्रयत्नशील आहेत.  तिकडे देवळ्यातून निवडून आलेल्या धनश्री केदा अहेर यांचे पती केदा अहेर भाजपाकडूनच तूर्तास जिल्हा परिषदेत सभापती असल्याने त्यांचाही दावा कायम आहे. देवळा मतदारसंघातीलच यापूर्वीही जिल्हा परिषदेत निवडून आलेले सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनीही दावा सांगितला आहे.  तिकडे सिन्नरमधून माजी आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सिमंतीनी कोकाटे निवडून आल्याने पुढील विधानसभेची लढत लक्षात घेऊन शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपाकडून सिन्नरला पद दिले जाऊ शकते. भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेसोबत युती झालीच नाही तर पर्याय म्हणून आतापासूनच राष्ट्रवादी व कॉँग्रेससह अपक्षांसोबत चर्चा सुरू ठेवल्याचे कळते. (प्रतिनिधी)