शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील महाभारतातून भाजपचे निर्नायकत्व उघड

By किरण अग्रवाल | Updated: March 1, 2020 00:21 IST

राज्यातील सत्ता जाताच नाशिक महापालिकेतील भाजपच्या सत्तेलाही घरघर लागली आहे. अर्थात, कोट्यवधींच्या भूसंपादनावरून भाजपत शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले असून, वरिष्ठ नेत्यांवर चुकीच्या अपेक्षांचे आरोप केले जाऊन थेट पंतप्रधानांचे दरवाजे ठोठावण्याचे सांगितले गेल्याने पक्षाची अवस्था दयनीय बनली आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींच्या भूसंपादनातून रोवली गेली सत्ताधाऱ्यांत फुटीची बीजेवरिष्ठ नेत्यांवरील आरोपाने ओढवली अवघड स्थिती

सारांशस्वयंप्रज्ञेचा सक्षम कर्ता कुटुंबात नसला की जी अवस्था ओढवते तीच गत राजकारणातील पक्षांची अगर स्थानिक स्वराज्य संस्थांचीही होते, हे नाशिक महापालिकेतील वर्तमान स्थिती व तेथील सत्ताधारी भाजपच्या दयनीयतेवरून स्पष्ट व्हावे. पेशवाई बुडाल्याची कारणे इतिहासात शोधायला जाण्याऐवजी नाशिक महापालिकेतील कारभाराकडे बारकाईने पाहिले तरी पुरे, अशा पद्धतीचा बारभाई व निर्नायकीपणा येथे आढळून येतो हे नाशिककरांचे दुर्दैव म्हणता यावे.कुठल्याही संस्थेतील स्पष्ट बहुमताकडे स्थैर्याची बाब म्हणून पाहिले जात असते. नाशिक महापालिकेत तर भाजपकडे निर्णायक बहुमत आहे; परंतु या सत्ताधारी पक्षाकडे खंबीर, निर्णयक्षम, प्रभावशाली व सर्वमान्य नायकच नसल्याने स्थानिक पातळीवर पक्षात आणि महापालिकेतही जणू बजबजपुरीच माजली आहे. राज्यातील सत्तेतून भाजपला बाहेर राहावे लागल्यानंतर ‘दत्तक’ पालकांचेही दुर्लक्ष झाले आहे. देवेंद्र फडणवीस त्यांच्या विवंचनेत अडकले, तर गिरीश महाजन यांचेही दौरे कमी झालेत; त्यामुळे नाशकातील भाजपला कुणी वालीच उरला नाही. म्हणायला शहरात तीन आमदार, महापालिकेत सत्ता; राज्यस्तरावर प्रतिनिधित्व करणारे खंडीभर पक्ष पदाधिकारी आहेत; परंतु कुणाचा कुणाला पायपोस नाही. सर्वांचेच आपले सवतेसुभे आहेत. परिणामी रामभरोसे कारभार सुरू आहे.मुळात महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी या पक्षाचे पदाधिकारी व अन्य नगरसेवकांत समन्वय, सलोखा नाही हे यापूर्वीही अनेकदा उघड होऊन गेले आहे. आता १५७ कोटी रुपयांच्या भूसंपादनाच्या विषयावरून या बिनसलेपणात भर पडून गेली आहे. पैसा व त्याअनुषंगाने येणारा मतलब कुठेही ‘महाभारत’ घडवतो, तसे या भूसंपादनाचे म्हटले पाहिजे. कारण, स्थायी समितीला याबाबत निर्णय घेण्याची घाई झाली असताना, महासभेने त्यांच्या अधिकारावरच प्रश्न उपस्थित केले. गंमत म्हणजे, महासभेचे प्रमुख असणारे निर्णयकर्ते महापौर भाजपचे व स्थायी समितीचे सभापतीही याच पक्षाचे. तरी अधिकाराच्या निमित्ताने पक्षांतर्गत रस्सीखेच चव्हाट्यावर आणली गेली आहे. शिवसेनेने मंत्रालयातून यासंबंधात स्थगिती मिळवली, तर स्थायी सभापतींनी ‘मनसे’च्या नगरसेवकास पुढील सभापतिपद बहाल करून टाकले. इतकेच नव्हे तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून अवास्तव मागण्या केल्या गेल्याचे व त्या पूर्ण न केल्याने पक्षातूनच कोंडी झाल्याचे सांगितल्याने इतरांपेक्षा वेगळे राजकारण करण्याच्या बाता मारणाºया भाजपचा मुखवटा महापालिकेतही गळून पडला आहे. अर्थात, इतर पक्षांमधून आलेल्या उधार-उसनवारीच्या सदस्यांकडून यापेक्षा वेगळ्या अपेक्षाही करता येऊ नयेत.महत्त्वाचे म्हणजे, स्थायी समिती सदस्य पदासाठीच्या नेमणुका करतानाही असेच अनागोंदीचे चित्र पहावयास मिळाले. महापौरपदाच्या स्पर्धेत राहिलेलेही स्थायीच्या सदस्यत्वासाठी वंचित ठरले असताना नवख्या नगरसेवकांनी पक्षाला वेठीस धरल्यासारखे चित्र साकारले. विशेष असे की, आंदोलनबाजी करून पक्षाची अब्रू वेशीवर टांगणाऱ्यांना पक्षाच्या शहराध्यक्षांनी पुढच्यावेळी संधी देण्याचा शब्द देऊन टाकला. पक्षातले तुमचे वय, कर्तृत्व काय हे विचारायचे धाडस ते दाखवू शकले नाही. ही अशी असहायता कशातून आली असावी, हा यातील खरा प्रश्न आहे. म्हणजे, निष्ठेने पक्षकार्य करणाºयांनी आहे तेथेच राहायचे आणि बाहेरून आलेल्यांनी विद्रोही सूर आळवून पुढच्या संधीचे शब्द मिळवून घ्यायचे; अशातून निष्ठावंतांच्याही सहनशीलतेची परीक्षाच घेतली जात असल्याचे जे चित्र आकारास येते आहे ते पक्षाला मजबूत करेल की कमकुवत, याचा विचार कुणी करायचा?महापौर असोत, की सत्ताधारी पक्षाचे शहराध्यक्ष; यातील कुणीही निर्णयक्षम नसल्याचाच हा परिपाक म्हणता यावा. सतीश कुलकर्णी यांना निष्ठा व ज्येष्ठत्वातून महापौरपद लाभलेले असल्याने ते गोंधळी सहकारींना वठणीवर आणण्याची शक्यता नाही, तर गिरीश पालवे यांच्यावर परावंलबित्वाचा ठपका असल्याने ते स्वयंप्रज्ञेने काही करू धजावणारे नाहीत. उभयतांतील नेतृत्व व संघटन कुशलतेचा हा अभावच पक्षातील बेदिलीला पूरक ठरतो आहे. बजबजपुरी माजली आहे ती त्यामुळेच. महापालिकेतील सत्तेची अडीच-तीन वर्षे निघून गेलीत. आता साºयांच्या खिशात खाज सुटली आहे. भूसंपादनाचा विषय पक्षांतर्गत मतभिन्नतेला निमंत्रण देऊन पक्षाला फुटीच्या उंबरठ्यावर नेऊन पोहचविणारा ठरण्याची कारणेही त्यातच दडली आहेत.

 

टॅग्स :PoliticsराजकारणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपाMayorमहापौर