शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा विरोधक एकवटले

By admin | Updated: April 9, 2017 00:04 IST

महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही विरोधकांना स्थायी समितीसह अन्य विषय समित्यांवर प्रतिनिधित्व मिळण्याची आस कायम आहे

 नाशिक : राजकारणात कुणी कुणाचा शत्रू अथवा मित्र नसतो. सत्तापदांचा लाभ मिळविण्यासाठी पक्षीय विचारसरणी अथवा ध्येयधोरणांना तिलांजली दिली जाते आणि एकमेकांच्या गळ्यात गळे घातले जातात. महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही विरोधकांना स्थायी समितीसह अन्य विषय समित्यांवर प्रतिनिधित्व मिळण्याची आस कायम असून, त्याचेच निमित्त होत सर्व भाजपा विरोधक एकवटले आहेत. स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपा विरोधात असलेल्या सेनेच्या उमेदवाराला कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेच्या सदस्यांनी मतदान करत संघर्षाचे बिगुल फुंकले आहे. महापालिका निवडणुकीत भाजपाने ६६ जागा जिंकत स्पष्ट बहुमत प्राप्त केले तर त्याखालोखाल शिवसेना-३५, कॉँग्रेस-६, राष्ट्रवादी-६, मनसे-५, अपक्ष-३ आणि रिपाइं-१ असे बलाबल आहे. महापालिकेत भाजपाकडे स्पष्ट बहुमत असल्याने सर्व सत्तापदे साहजिकच भाजपाच्याच ताब्यात जाणार, हे निश्चित आहे. मात्र, भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेसह सर्व विरोधक एकत्र आले आहेत. महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाल्याने विरोधकांची भूमिका स्पष्ट झालेली नव्हती. परंतु, स्थायी समितीसह अन्य विषय समित्यांवर तौलनिक संख्याबळात आपण भाजपाच्या ऊरात धडकी भरवू शकतो, हे लक्षात आल्याने सेनेसह सर्व विरोधकांनी एकत्र येत विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणीचा डाव रचला. या डावात कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेने अपक्षांना सोबत घेत बाजी मारली परंतु शिवसेना-रिपाइंच्या गटनोंदणीला विभागीय आयुक्तांच्या निर्णयाने खोडा घातला. त्यामुळे तौलनिक संख्याबळात भाजपाच सरस राहिली. शिवसेनेने विभागीय आयुक्तांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असले तरी त्या निर्णयाची प्रतीक्षा करेपर्यंत भाजपा मात्र सत्तापदांचा पुरेपूर लाभ उठवणार आहे. विभागीय आयुक्तांनी सेना-रिपाइं एकत्रित गटनोंदणी केली असती तर स्थायीवर ८-८ असे समसमान बलाबल होऊन सभापतिपदासाठी चिठ्ठी पद्धतीचा अवलंब करावा लागला असता. परंतु, सद्यस्थितीत भाजपाचे ९ आणि विरोधकांचे ७ असे बलाबल असल्याने स्थायीवर भाजपाचाच वरचष्मा असणार आहे. स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या निमित्ताने सेना उमेदवाराला उघडपणे मतदान करत कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेने आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे यापुढे सभागृहात ६६ विरुद्ध ५६ असा सामना बघायला मिळणार आहे. मागील पंचवार्षिक काळातील उत्तरार्धातही भाजपा विरोधात अन्य सर्व पक्ष एकवटले होते. आताही त्याचीच पुनरावृत्ती बघायला मिळणार असून, ही भाजपाविरोधी आगामी संघर्षाची नांदी मानली जात आहे. (प्रतिनिधी)