शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
4
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
5
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
6
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
7
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
8
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
9
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
10
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
11
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
12
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
13
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
14
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
15
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
16
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
17
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
18
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
19
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
20
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
Daily Top 2Weekly Top 5

सेनेला टक्कर देण्यासाठी भाजपा, मनसेची रणनीती

By admin | Updated: January 13, 2017 01:07 IST

प्रभाग २५ : तुल्यबळ उमेदवार देण्याचा प्रयत्न; सर्वांचे लक्ष लागून

नरेंद्र दंडगव्हाळ सिडको
सलग दहा वर्षांपासून सेनेचे प्राबल्य असलेल्या सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ मध्ये सेनेला शह देण्यासाठी मनसे, भाजपा, कॉँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वच पक्ष सेनेच्या उमेदवारांसमोर ताकदवान उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करीत असून, याबाबत भाजपा व मनसे काय रणनीती आखणार आहे.
गेल्या वीस वर्षांपूर्वी सावतानगर, पाटीलनगर, मोती चौकासह येथील परिसरात कॉँग्रेसचे वर्चस्व होते. यानंतर मात्र गेल्या दहा वर्षांपासून सेनेने या ठिकाणी वर्चस्व निर्माण केले असल्याचे दिसत आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या करिष्म्यामुळे मनसेलाही जनतेने कौल दिल्याने सिडको भागात २२ पैकी तब्बल सात उमेदवार निवडून आले. परंतु अलीकडच्या काळात मनसेवर नाराज असलेले अनेक नगरसेवक हे मनसेतून इतर पक्षांत गेल्याने मनसेच्या उमेदवारावांची संख्या कमी झाली आहे. या प्रभागातून मनसेचे दोन विद्यमान नगरसेवक निवडणूक लढविणार असल्याने मनसेसाठीदेखील ही प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. या प्रभागातून शिवसेनेकडून विद्यमान नगरसेवक सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, विभागप्रमुख किरण शिंदे, महिला आघाडीच्या संघटक शोभा गटकळ, माजी नगरसेवक शोभा निकम, श्यामकुमार साबळे, पवन मटाले,अभय पवार आदि इच्छुक आहेत, तर मनसेकडून विद्यमान नगरसेवक अनिल मटाले, कांचन पाटील, अ‍ॅड. अतुल सानप, सचिन रोजेकर यांच्या आई सावित्री रोजेकर, तर भाजपाकडून मंडल उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश अमृतकर, मुरलीधर भामरे, मंडल अध्यक्ष गिरीश भदाणे यांच्या पत्नी वैशाली भदाणे, भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष राकेश ढोमसे यांच्या पत्नी भाग्यश्री ढोमसे, युवा मोर्चा कोषाध्यक्ष केतन अवसकर यांच्या पत्नी आसावरी अवसरकर, गणेश अरिंगळे, संगीता पाटील, मनोज बिरार, आशिष हिरे आदि इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून अमोल नाईक, विजय मटाले, मुकेश शेवाळे आदि इच्छुक आहेत. कॉँग्रेसकडून माजी नगरसेवक अण्णा पाटील यांचे चिरंजीव भरत पाटील व अपक्ष म्हणून तुषार साळुंके इच्छुक आहेत.