BJP candidate for mayor will be today | महापौरपदासाठी भाजपाचा उमदेवार आज ठरणार
महापौरपदासाठी भाजपाचा उमदेवार आज ठरणार

ठळक मुद्देमहाजन काळकर ऐकणार नगरसेवकांची मतेकॉँग्रेसचे नगरसेवक सहलीवरराष्टÑवादीचे आज ठरणार

नाशिक-भाजपातील आठ जण संपर्क क्षेत्राबाहेर तर विरोधी आघाडीची तीन दिशेला तीन तोंडे यामुळे महापौरपदाची निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर आली असताना देखील समिकरणे जुळवणे अवघड झाले आहे. दरम्यान, भाजपचा उमेदवार मंगळवारी (दि.१९) निश्चित होण्याची शक्यता आहे. माजी पालकमंत्री गिरीश महाजन आणि उत्तर महाराष्टÑ संघटनमंत्री किशोर काळकर सध्या कोकणात असलेल्या भाजप नगरसेवकांशी चर्चा करून निर्णय देणार आहेत.

शुक्रवारी (दि.२२) रोजी महापौरपदाची निवडणूक होत असून त्यासाठी मनसे आणि राष्टÑवादी वगळता सर्व पक्षांनी आपले नगरसेवक सहलीवर पाठविले आहेत. सोमवारी (दि.१८) कॉँग्रेसचे नगरसेवक रवाना झाले. तर राष्टÑवादीचे नगरसेवक अद्याप रवाना झालेले नाही. मंगळवारी (दि.१९) उमेदवारी अर्ज घेऊन ते रवाना होण्याची शक्यता असल्याचे राष्टÑवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांगितले.

भाजपाच्या संपर्कात दहा ते बारा नगरसेवक नव्हते. मात्र अनेकांचा संपर्क झाला असून आता अवघ्या आठ जणांचा संपर्क होऊ शकला नसल्याची माहिती गटनेते जगदीश पाटील यांनी दिली. अर्थात, त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांच्याशी संपर्क झाला असे भगवान दोंदे, राकेश दोंदे आणि पुंडलीक खोडे असे तीन नगरसेवक भाजपाच्या कॅम्प बरोबर सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत.

 

Web Title: BJP candidate for mayor will be today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.