शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘बायोमेट्रिक’ प्रणाली निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:55 IST

‘स्मार्ट सिटी’च्या गप्पा मारणाºया नाशिक महापालिकेच्या मुख्यालयातील अधिकारी-कर्मचाºयांची हजेरी घेण्यासाठी दोन वर्षांपूर्वी बसविण्यात आलेली बायोमेट्रिक प्रणाली निरुपयोगी ठरली असून, अद्यापही कर्मचाºयांचे मासिक वेतन हे पारंपरिक पद्धतीनुसार हजेरी मस्टरद्वारेच अदा केले जात आहे.

नाशिक : ‘स्मार्ट सिटी’च्या गप्पा मारणाºया नाशिक महापालिकेच्या मुख्यालयातील अधिकारी-कर्मचाºयांची हजेरी घेण्यासाठी दोन वर्षांपूर्वी बसविण्यात आलेली बायोमेट्रिक प्रणाली निरुपयोगी ठरली असून, अद्यापही कर्मचाºयांचे मासिक वेतन हे पारंपरिक पद्धतीनुसार हजेरी मस्टरद्वारेच अदा केले जात आहे. बायोमेट्रिक हजेरी प्रणालीद्वारे होणाºया नोंदींची वेतनासाठी दखलच घेतली जात नसल्याने कामचुकार कर्मचारी-अधिकारी निर्ढावले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामकाजावर प्रशासनाचे कसलेही नियंत्रण उरलेले नाही.केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ अभियानात नाशिक शहराचा समावेश झाल्यानंतर दोन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी डिजिटलायेझशनची सुरुवात महापालिका मुख्यालयापासून केली. त्यासाठी, त्यांनी महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधीभवनसह सहाही विभागीय कार्यालयांमध्ये कर्मचारी व अधिकाºयांच्या दैनंदिन हजेरीसाठी बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित केली. महापालिकेच्या सफाई कामगारांच्या हजेरीबाबतही तक्रारी लक्षात घेऊन त्यांनी सफाई कामगारांसाठीही बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्याचा प्रयत्न केला परंतु, त्याला कामगार संघटनांनी विरोध दर्शविला होता. दोन वर्षांपासून मुख्यालयात बायोमेट्रिक प्रणाली बसविण्यात आलेली आहे आणि संगणक विभागामार्फत त्याच्या दैनंदिन नोंदीही ठेवल्या जात आहेत. याशिवाय, प्रत्येक खातेप्रमुखाला यूजर आयडी आणि पासवर्डही देण्यात आलेला आहे. खातेप्रमुखांनी आपल्या विभागातील कर्मचाºयांच्या उपस्थितीवर नजर ठेवत त्यांचे मासिक वेतन त्या माध्यमातून अदा करावे, असा हेतू आहे. परंतु, धक्कादायक बाब म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून बायोमेट्रिक प्रणालीच्या नुसत्याच नोंदी घेतल्या जात असून, प्रत्यक्ष कर्मचारी-अधिकाºयांचे वेतन मात्र जुन्याच पारंपरिक पद्धतीने हजेरी मस्टरद्वारे काढले जात आहे. अनेक कर्मचारी हे बायोमेट्रिक प्रणालीद्वारेही थंब देतात आणि कार्यालयात आल्यानंतर हजेरी मस्टरवरही स्वाक्षºया करतात. परंतु, वेतन हे मस्टरमधील नोंदींद्वारेच होत असल्याने बव्हंशी कर्मचारी हे बायोमेट्रिक प्रणालीचा वापरच करत नाहीत. त्यामुळे मस्टरमध्ये हवे तेव्हा फेरबदल करणे शक्य असते अथवा येण्या-जाण्याच्याही वेळा त्यांना पाहिजे त्याप्रमाणे टाकणे शक्य होते. बायोमेट्रिक प्रणाली कार्यरत असूनही त्यांचा वापर खातेप्रमुखांकडून पगार काढण्यासाठी केला जात नाही. लेखा विभागाकडे नोंदीच पाठविल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. मुख्यालयाप्रमाणेच सहाही विभागांंत वेगळी स्थिती नाही. स्मार्ट सिटीचे ढोल बडविणाºया महापालिका प्रशासनाचा त्यांच्या मुख्यालयातीलच बायोमेट्रिक प्रणालीचा बार फुसका ठरला आहे.