शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

एक्साइड लाइफ इन्शुरन्सला बिमा लोकपालचा दणका

By admin | Updated: November 15, 2015 23:15 IST

फसवणूक : तक्रारदाराला व्याजासह पैसे परत

नाशिक : बंद पडलेल्या इन्शुरन्स पॉलिसीवर बोनस देण्याचे आमिष दाखवत नवीन पॉलिसी लादणाऱ्या आणि ३० हजार रुपये हडपणाऱ्या बंगळुरू येथील एक्साइड लाइफ इन्शुरन्स या कंपनीला पुणे येथील बिमा लोकपालने तक्रारदारास व्याजासह रक्कम परत करण्याचे आदेश दिल्यानंतर कंपनीने पैसे परत केले असल्याची माहिती ग्राहक पंचायतीचे मेजर पी. एम. भगत यांनी दिली आहे.‘तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीवर ८० हजारांचा बोनस जाहीर झालेला आहे. पण तो मिळविण्यासाठी तुम्हाला ३० हजार रुपये भरावे लागतील’ असा फोन बंगळुरू स्थित एक्साइड लाइफ इन्शुरन्स या कंपनीच्या प्रतिनिधीकडून अजंली दिंडोरकर यांना आला. दिंडोरकर यांनी यापूर्वी बिर्ला सनलाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेतली होती, परंतु ती २००८ मध्येच बंद झाली होती. परंतु बंद झालेल्या पॉलिसीवरही बोनस मिळतो ही माहिती दिंडोरकर यांना नवीच होती. पॉलिसीचा काही नियम असेल म्हणून अंजली दिंडोरकर यांनी ३० हजार रुपये आवश्यक त्या कागदपत्रांसह कंपनीला पाठविले, परंतु ८० हजारांचा बोनस तर दूरच त्याऐवजी कंपनीने नवीन पॉलिसी करून पाठविली आणि प्रीमिअम भरण्याचा तगादा सुरु केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिंडोरकर यांनी ज्यांनी बोनसचा फोन केला होता त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. एक्साइड लाइफ इन्शुरन्स कंपनीकडूनही उडवाउडवीची उत्तरे मिळायला लागली. अखेर दिंडोरकर यांनी ग्राहक पंचायतीचे मेजर पी. एम. भगत यांच्याशी संपर्क साधला. भगत यांनी संपूर्ण केसचा अभ्यास करत मुंबई व पुणे येथील बिमा लोकपालकडे लिखित तक्रार देण्याचा सल्ला दिंडोरकर यांना दिला. त्यानुसार दिंडोरकर यांनी तक्रार केल्यानंतर त्यावर दि. १६ आॅक्टोबर रोजी सुनावणी झाली. दिंडोरकर यांनी लोकपालांसमोर स्वत:च बाजू मांडली. युक्तिवादानंतर लोकपालाने एक्साइड लाइफ इन्शुरन्स कंपनीने १५ दिवसात ३० हजार रुपये ९ टक्के व्याजासह अंजली दिंडोरकर यांना परत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बिमा कंपनीने दिंडोरकर यांना व्याजासह ३४ हजार रुपये ५२५ रुपये परत केले आहेत. (प्रतिनिधी)