दिल्लीतील आंदोलकांच्या समर्थनार्थ नाशिक मध्ये बाईक रॅली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 15:38 IST2021-01-26T15:38:29+5:302021-01-26T15:38:42+5:30
शहरातील विविध मार्गावरून फिरवत या रॅलीचा नाशिकरोड येथे समारोप करण्यात आला.

दिल्लीतील आंदोलकांच्या समर्थनार्थ नाशिक मध्ये बाईक रॅली
नाशिक - केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीत आणि मुंबईत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज नाशिकमध्ये किसान सभा, आयटक आणि श्रमिक सेवा संघाच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली. सीबीएस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शालिमार ते नाशिकरोड ही रॅली काढण्यात आली.
शहरातील विविध मार्गावरून फिरवत या रॅलीचा नाशिकरोड येथे समारोप करण्यात आला. यावेळी कॉ. राजू देसले, संघटनेचे नेते महादेव खुडे, रिपब्लिकन पक्षाचे नेते शशिकांत उनव्हणे यांनी मनोगत व्यक्त व्यक्त करताना केंद्र सरकारवर टीका केली.
या बाईक रॅलीत भाकपचे दत्तू तुपे तसेच छात्रभारतीचे पदाधिकारी आणि नाशिक महापालिकेचे घंटागाडी कामगार सहभागी झाले होते.