शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

नॅबच्या विद्यार्थी वसतिगृहाचा बुधवारी भूमिपूजन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:45 IST

नाशिक : अंध बांधवांसह दिव्यांग विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, संशोधन तसेच विशेष शिक्षणासंदर्भात अद्ययावत ज्ञान प्राप्त करण्याकरिता कार्यशाळा घेण्यासाठी ...

नाशिक : अंध बांधवांसह दिव्यांग विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, संशोधन तसेच विशेष शिक्षणासंदर्भात अद्ययावत ज्ञान प्राप्त करण्याकरिता कार्यशाळा घेण्यासाठी निवासी व्यवस्था व्हावी, यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड संस्थेच्या नाशिक शाखेच्यावतीने नॅब महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण विद्यार्थी वसतिगृहाचा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते बुधवारी (दि. ३) होणार आहे.

सातपूरला नॅबच्या जागेत या वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता होणार असल्याची माहिती नॅब महाराष्ट्रचे अध्यक्ष रामेश्‍वर कलंत्री, मानद महासचिव गोपी मयूर व नॅब नाशिकचे चेअरमन व सहसचिव मुक्तेश्‍वर मुनशेट्टीवार, राजेंद्र कलाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अधिक माहिती देताना कलंत्री म्हणाले की, ६० मुलींच्या निवासाची व्यवस्था या वास्तूमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात नॅब महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष व विश्वस्त तसेच उद्योगपती देवकिसनजी सारडा यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या वसतिगृहाच्या उभारणीसाठी ३ कोटी रुपये खर्च येणार असून, त्यामध्ये उच्चशिक्षण घेणारे विद्यार्थी, विषयतज्ज्ञ व्याख्याते, प्रशिक्षणार्थींना अद्ययावत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सूर्यभान साळुंके, मुक्तेश्‍वर मुनशेट्टीवार, मंगला कलंत्री, विनोद जाजू, राजेंद्र कलाल व श्याम पाडेकर उपस्थित होते.