शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भोंगळे रस्त्यावरील अतिक्रमणे लवकरच काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 02:16 IST

नांदगाव : भोंगळे रस्त्यावरील अतिक्रमणे नगर परिषदेने प्रथम हटवावी त्यानंतर रेल्वे प्रशासन भोंगळे रस्त्याशी संलग्न आपले बांधकाम करून देईल ...

ठळक मुद्देनांदगाव : आमदारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत निघाला तोडगा

नांदगाव : भोंगळे रस्त्यावरील अतिक्रमणे नगर परिषदेने प्रथम हटवावी त्यानंतर रेल्वे प्रशासन भोंगळे रस्त्याशी संलग्न आपले बांधकाम करून देईल यावर मतैक्य होऊन गेले सहा महिने सुरू असलेला तिढा संपण्याची चिन्हे दृष्टिपथात आली असून, नांदगावकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.भुयारी मार्गावर (सब वे) सहा मीटरचा अरुंद रस्ता व त्यानंतर लगेचच आलेले काटकोनातले तीव्र वळण यामुळे अपघात होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. वळणावर पर्यायी सरळ रस्ता करून तो नगर परिषदेच्या हद्दीत भोंगळे रस्त्याला संलग्न करून द्यायला रेल्वे तयार होती. परंतु नगर परिषदेसमोर अतिक्रमणे हटविण्याचा प्रश्न होता.अतिक्रमणे हटविताना मटण मार्केट तोडावे लागेल हा मुद्दा प्रशासनाने संवेदनशील ठरवून कारवाई करण्याचे टाळले. त्यामुळे अतिक्रमणे हटविण्यासाठी गेलेले पथक व पोलीस कार्यवाही न करता माघारी फिरले. गेले काही महिने हा मुद्दा झारीतला शुक्राचार्य ठरला.मटण मार्केटप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अपिलाची सुनावणी मंगळवारी (दि. २४) होणार आहे. दुसरीकडे रेल्वे फाटक बंद करून तयार करण्यात आलेला सब वे प्रश्नावर भीमशक्तीचे जिल्हा नेते मनोज चोपडे व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सानप यांनी सुरू केलेले उपोषण सोमवारी (दि.२३) आमदार सुहास कांदे व नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या हस्ते या बैठकीनंतर सोडण्यात आले.फाटक बंदच्या निर्णयामुळे फाटकाबाहेरील औरंगाबाद व येवला रोड भागाकडील नागरिकांपुढे दैनंदिन संपर्काची समस्या निर्माण होणार आहे. पर्याय म्हणून स्वीकारण्यात आलेल्या सब वेच्या कामातील तांत्रिक त्रुटी व अन्य कारणांमुळे हा सब वे विवादग्रस्त झालाय. रेल्वे फाटकाला यापूर्वी पर्याय म्हणून बांधण्यात आलेला उड्डाणपूल दोन किलोमीटर लांब असल्याने चार किमीचा वळसा घालून नागरिकांना यावे लागते.सब वे तयार करताना यंत्रणेने रहदारीची घनता लक्षात घेतली नसल्याने व त्यात तांत्रिक त्रुटी राहून गेल्याने परिषद व रेल्वे प्रशासन यांच्यातला समन्वयाचा अभाव प्रकर्षाने नागरिकांना जाणवला. आमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थानी नगराध्यक्ष राजेश कवडे शिवसेनेचे नेते संतोष गुप्ता, प्रमोद भाबड, सागर हिरे, मनोज चोपडे, तहसीलदार उदय कुलकर्णी, रेल्वेचे अभियंता केदारे, मुख्याधिकारी पंकज गोसावी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल चोळके, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांची बैठक पार पडली. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडी