Ashok Kharat : "... तर तुझा मृत्यू अटळ", भोंदूबाबा अशोक खरातने थेट तुर्कस्थानातून मागवलं ९० लाखांचं फर्निचर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 10:43 IST2026-03-26T10:42:54+5:302026-03-26T10:43:56+5:30
Ashok Kharat : नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील मिरगावामध्ये भोंदूबाबा अशोक खरात याने उभारलेल्या आलिशान टोलेजंग अशा फार्महाउसमध्ये फर्निचर थेट तुर्कस्थानातून मागवून लावण्यात आलं आहे.

Ashok Kharat : "... तर तुझा मृत्यू अटळ", भोंदूबाबा अशोक खरातने थेट तुर्कस्थानातून मागवलं ९० लाखांचं फर्निचर
नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील मिरगावामध्ये भोंदूबाबा अशोक खरात याने उभारलेल्या आलिशान टोलेजंग अशा फार्महाउसमध्ये फर्निचर थेट तुर्कस्थानातून मागवून लावण्यात आलं आहे. यासाठी पुण्याचे बांधकाम व्यावसायिक फिर्यादी राजेंद्र जासूद यांना तब्बल ९० लाख रूपये खर्च करण्यास बाबाने भाग पाडल्याचं त्यांनी फिर्यादीत म्हटलं आहे. फार्महाउस बांधकामासह इंटेरिअर आणि फर्निचरसाठी तब्बल अडीच कोटी रूपये भोंदू खरातने त्यांच्याकडून उकळले आहे.
लॉजिस्टिकचा व्यवसाय परदेशात सुरू करायचा म्हणून आशिर्वाद घेण्यासाठी जासूद यांना खरात बाबाकडे जाणे चांगलेच महागात पडले. जून २०२२साली जासूद यांना भोंदू खरात याने सिन्नरच्या मिरगावातील ईशान्येश्वर महादेव मंदिरात बोलावून घेतले. भोंदूबाबाने बांधलेल्या नव्या वास्तूमध्ये उत्तरपुजा करावी लागेल असे सांगून माझ्या नव्या वास्तूमध्ये (आलिशान फार्महाउस) तुर्कस्थानचे लाकडी व लोखंडी फर्निचर बसवावे लागेल, तरच उत्तरपुजा करताना नकारात्मक उर्जा त्या फर्निचरमध्ये समावून नष्ट होईल, असे भोंदू खरातने सांगितले. तसे न केल्यास तुझा मृत्यू अटळ असल्याची पुन्हा भीती दाखविली आणि मंदिराच्या पाठीमागे घेऊन जात जमिनीवर रिंगण आखून त्यामध्ये जासूद यांना उभे केले आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यास तू जळून भस्म होशील, असे सांगून फर्निचर बुकिंगरिता दबाव वाढविला.
गुगलच्या 'मोस्ट सर्च्ड' कॅटेगरीत 'भोंदूबाबा' टॉपवर; लोक शोधताहेत अशोक खरातचे काळे कारनामे
जीवाच्या भीतीने घाबरून ओळखीचे असलेले फर्निचर व्यवसायातील एजंट यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्यामार्फत बुकिंग केली. २०२२-२०२३सालापर्यंत फार्महाऊससाठी तुर्कस्थानातून तब्बल ९० लाखांचे फर्निचर विकत घेऊन भोंदू खरातला दिले. त्यानंतर सागवानी लाकडामध्ये फर्निचर बनवून देण्यासाठी पुण्याच्या टिंबर मार्केटमधून २९ लाखांचे सागवानी लाकूड बळजबरीने खरेदी करण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
"मी तुझं करिअर घडवेन, विरोध केल्यास वडिलांचा मृत्यू"; अशोक खरातवर आणखी एक गुन्हा
अंधश्रद्धेचा बाजार! खरात बाबाच्या वर होता आणखी एक भोंदूबाबा; गंडादोरा देणाऱ्याचाही शोध सुरू
फार्महाउसमधील किचन ४३ लाखांचे
भोंदू खरात याने बांधलेल्या फार्महाउसमधील फक्त स्वयंपाकघराची सजावट ४२ लाख ५० हजाराची आहे. तेथे बसविण्यात आलेल्या विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, साधनसामुग्रीसुद्धा भोंदू खरात याने जासूद यांच्यामार्फत खरेदी करून घेतली आहे.
दैवी शक्ती, खोलीत पवित्र आत्मा, तीर्थ, पूजा...; महिलांना 'असं' जाळ्यात अडकवायचा अशोक खरात
उत्तरपुजा अन् फार्महाउसची पायाभरणी
अवतारपुजेच्या नावाखाली परदेशवारी आणि अमेरिकेमध्ये वैद्यकिय उपचाराची गरज पूर्ण करून घेतल्यानंतर खरात याने जासूद यांच्यापुढे 'उत्तरपुजा' करण्याचे जाळे फेकले. २०१९ ते २०२२ सालापर्यंत उत्तरपुजा करण्याकरिता त्यांच्या नव्या वास्तूची उभारणी झाली पाहिजे असे सांगून जासूद यांच्याकडून मिरगाव येथील फार्महाउसच्या बांधकामासाठी तब्बल १ कोटी ११ लाख रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे.