शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अवघा एक धोकादायक वृक्ष तोडण्यास मान्यता

By admin | Updated: July 20, 2016 00:50 IST

वृक्षप्राधिकरण समिती : ४७ वृक्षांबाबत परवानगी नाकारली

नाशिक : गेल्या शनिवारी (दि.१६) महात्मा गांधी रोडवरील वकीलवाडीत कडुनिंबाचा जुना वृक्ष कोसळून तिघे गंभीर झाल्याच्या घटनेनंतर शहरातील धोकेदायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असताना मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीच्या बैठकीत १७ पैकी अवघा एक धोकादायक वृक्ष तोडण्यास मान्यता देण्यात आली. उर्वरित वृक्षांची पाहणी करून निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. याशिवाय शहरातील १७६ वृक्षांचा विस्तार कमी करण्यास मान्यता देतानाच ४७ वृक्षांचा विस्तार करण्यास मात्र परवानगी नाकारण्यात आली. महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीची बैठक आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रा. कुणाल वाघ आणि अरविंद शेळके हे अवघे दोन सदस्य उपस्थित होते. उद्यान विभागाकडे शहरातील विविध विभागांतील धोकेदायक झाडे तोडण्यासंबंधीचे ५८ प्रस्ताव मान्यतेसाठी आले होते. त्यातील १७ झाडे तातडीने तोडण्याची गरज असल्याचा प्रस्ताव वृक्षप्राधिकरण समितीपुढे ठेवण्यात आला होता. यावेळी अवघे एक धोकादायक झाड तोडण्यास मान्यता देण्यात आली, तर अन्य झाडांची उद्यान अधीक्षक आणि उद्यान निरीक्षक यांनी पाहणी करून तसा प्रस्ताव ठेवण्याचे आदेशित करण्यात आले.