शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

बीट मार्शलच्या डोळ्यात फेकली मिरची पूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:55 AM

इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत गस्तीवर असलेल्या बीट मार्शलच्या डोळ्यांमध्ये पल्सर दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांपैकी एकाने मिरचीची पूड फेकून पोबारा केल्याची घटना घडली.

नाशिक : इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत गस्तीवर असलेल्या बीट मार्शलच्या डोळ्यांमध्ये पल्सर दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांपैकी एकाने मिरचीची पूड फेकून पोबारा केल्याची घटना घडली. सुदैवाने बीट मार्शल दुचाकीचालक पोलिसाने हेल्मेट घातलेले असल्यामुळे मिरची पूड डोळ्यांत गेली नसल्याने  अपघात टळला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस नाईक परमेश्वर सोपान महाजन हे बीट मार्शल इंदिरानगर पोलीस ठाणे हद्द पाथर्डी फाटा भागात गस्तीवर होते. शुक्रवारी (दि.२४) रात्री आठ वाजेच्या सुमारास दामोधर चौकात विनाक्रमांक असलेली पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या एकाने पोलिसांच्या दिशेने मिरचीची पूड फेकली.सुदैवाने महाजन यांनी हेल्मेट परिधान केलेले असल्यामुळे त्यांच्या डोळ्यांत अगदी किरकोळ प्रमाणात मिरची उडाली, मात्र हेल्मेट नसते तर मिरची पूड डोळ्यांत जाऊन कदाचित अपघात घडला असता. मात्र हेल्मेट असल्यामुळे महाजन यांनी पल्सरवरून भरधाव गेलेल्या संशयितांचा पाठलागही सुरू केला. अंधाराचा फायदा घेत ते निसटून जाण्यास यशस्वी ठरले. याप्रकरणी महाजन यांनी दिलल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोनसाखळी चोरट्यांनी उच्छाद मांडलेला असतानाच पोलिसाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून टवाळखोरांनी पोलीस यंत्रणेलाच जणू आव्हान दिले आहे. कोणतेही कारण नसताना पोलिसाच्या डोळ्यात मिरची पूड टाकण्याचा हा प्रकार पोलिसांनी गांभीर्याने घेतला असून, या प्रकरणी तपास सुरू आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक