शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

चार्जींग करताना बॅटरीचा स्फोट; इलेक्ट्रीक बाइक वापरताहेत सावधान....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 2:47 PM

सोसायटीच्या वीज मीटर असलेली संपुर्ण पेटी जळून राख झाली. यामुळे या इमारतीतील सर्व रहिवाशांच्या वीजमीटरचे नुकसान होऊन वीजपुरवठाही खंडीत झाला.

ठळक मुद्देआगीचा भडका अन‌् दुचाकीसह रहिवाशांच्या वीज मीटरचा कोळसारहिवाशांच्या वीजमीटरचे नुकसान

नाशिक : पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे अलिकडे नागरिकांचा इलेक्ट्रीक बाइक खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. इलेक्ट्रीक बाईक वापरताना आवश्यक ती खबरादारी घेणेही तितकेच गरजेचे आहे. इंदिरानगर परिसरातील पांडवनगरी भागात अशाच एका इलेक्ट्रीक बाइकची बॅटरी चार्जिंग करताना बॅटरी जळून लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत दुचाकीचा कोळसा झाला. ही बाब वेळीच लक्षात आल्याने अग्नीशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात येऊन वेळीच आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला.

इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील पांडवनगरी परिसरात असलेल्या 'ऐश्वर्या रेसिडेन्सी'च्या वाहनतळातील येथील रहिवाशी सुरजित सिंग यांनी सोमवारी (दि.१२) सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांच्या मालकीची इलेक्ट्रीक दुचाकी चार्जिंगसाठी अपार्टमेंटच्या वाहनतळात असलेल्या वीज मीटर पेटीच्या जवळ मुख्य स्वीचमध्ये जोडणी करुन लावली होती. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास प्रमाणापेक्षा जास्त बॅटरी चार्ज झाल्याने तीचा स्फोट होऊन दुचाकीला मोठी आग लागली. यामुळे सोसायटीच्या वीज मीटर असलेली संपुर्ण पेटी जळून राख झाली. यामुळे या इमारतीतील सर्व रहिवाशांच्या वीजमीटरचे नुकसान होऊन वीजपुरवठाही खंडीत झाला. घटनेची माहिती अग्नीशमन दलाला मिळताच सिडको उपकेंद्राचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझविली. यावेळी इंदिरानगर पोलीसही घटनास्थळी पोहचले होते. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.---

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलbikeबाईकAccidentअपघातPoliceपोलिस