शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

बकरी ईद : उद्या ‘ईदगाह’वरच होणार नमाजपठणाचा मुख्य सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 3:18 PM

पावसाच्या संततधारेने ईदगाह मैदानावर जमलेले पाणी जमिनीत मुरले असून, सोमवारी दिवभर संततधार सुरू असली तरी चिखलाचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे नमाजपठण करणे सहज शक्य होणार आहे, असे ईदगाह समितीचे म्हणणे आहे.

ठळक मुद्दे रेनकोट, छत्री, पाणकापड सोबत आणावेनमाजपठणाचा मुख्य सोहळा नियोजित वेळेच्या काही मिनिटे अगोदर मैदानावर साचलेल्या काही पाण्याच्या डबक्यांमध्ये मुरूम टाकला गेलामाजपठणाच्या सोहळ्याची इदगाह मैदानावर जय्यत तयारी

नाशिक: इस्लामी संस्कृतीचा दुसरा मोठा सण ईद-उल-अज्हा अर्थात बकरी ईद उद्या शहरासह जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरी केली जाणार आहे. ईदच्या सामुदायिक नमाजपठणाचा सोहळा पारंपरिक पद्धतीने नियोजित जागा शहाजहांनी ईदगाह मैदानावर सकाळी संपन्न होणार असल्याची माहिती शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी दिली. दोन दिवसांपासून शहरत पावसाच्या संततधारेचा वेग वाढला असला तरी उद्या सकाळी पावसाची उघडीप मिळण्याची आशा असून, नमाजपठण इदगाह मैदानावर केले जाणार असल्याचे खतीब यांनी सांगितले.पावसाच्या संततधारेने ईदगाह मैदानावर जमलेले पाणी जमिनीत मुरले असून, सोमवारी दिवभर संततधार सुरू असली तरी चिखलाचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे नमाजपठण करणे सहज शक्य होणार आहे, असे ईदगाह समितीचे म्हणणे आहे. मुस्लीम बांधवांनी नमाजपठणाच्या सोहळ्यासाठी उद्या इदगाहवर येताना रेनकोट, छत्री तसेच पावसाच्या पाण्यात ओले होणार नाही, अशाप्रकारचे पाणकापड सोबत आणावे, असे आवाहन खतीब यांनी केले आहे. नमाजपठणाचा मुख्य सोहळा नियोजित वेळेच्या काही मिनिटे अगोदर होणार आहे. नेहमीप्रमाणे इदगाहच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर शुचिर्भूत होण्यासाठी पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात येणार असल्याचे इदगाह समितीच्या वतीने सांगण्यात आले. पावसाची उघडीप मंगळवारी दिवसभरात जेवढी मिळाली त्या वेळेत महापालिका कर्मचाऱ्यांकडून मैदानावर साचलेल्या काही पाण्याच्या डबक्यांमध्ये मुरूम टाकला गेला. रोलरद्वारे मैदानाचे सपाटीकरण करण्यात आले आहे, जेणेकरून मातीचा दाब पक्का राहून चिखलाची समस्या उद्भवणार नाही. एकूणच नमाजपठणाच्या सोहळ्याची जय्यत तयारी इदगाह मैदानावर करण्यात आली आहे. पावसामुळे मैदान आलेचिंब जरी झाले असले तरी चिखलाचे प्रमाण कमी असल्याने नमाजपठणाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. धार्मिकदृष्ट्या बकरी ईदला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रेषित हजरत इब्राहिम व त्यांचे पुत्र हजरत इस्माईल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बकरी ईदपासून पुढे सलग तीन दिवस ‘कुर्बानी’ करण्याची प्रथा आहे. याचदरम्यान हज यात्राही पूर्ण केली जाते.

मशिदींमध्येही होणार नमाजपठणबकरी ईदनिमित्त उद्या सकाळी पारंपरिक पद्धतीने जुने नाशिकसह सिडको, सातपूर, वडाळागाव, नाशिकरोड, देवळालीगाव, भगूर आदी उपनगरीय भागांमधील मशिदींमध्येही नमाजपठणाचे नियोजन करण्यात आले आहे. मशिदीच्या प्रमुख धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली नमाजपठण संपन्न होणार आहे. दरम्यान, मुस्लीम बांधवांनी ईदची तयारी पूर्ण केली आहे. नागरिकांनी नवे कपडे खरेदी केले आहेत. बालगोपाळांमध्ये ईदचा उत्साह अधिक पहावयास मिळत आहे.

टॅग्स :Shajahaani Eidgahशाहजहांनी इदगाहNashikनाशिकBakri Eidबकरी ईदNamajनमाजMuslimमुस्लीम