शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

‘प्लॅस्टिक वादा’वरून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:38 IST

प्लॅस्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाला होणारी हानी रोखण्यासाठी शासनाने शनिवारपासून प्लॅस्टिक वापरावर बंदी लागू केल्याने त्याचा पहिलाच फटका नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांना बसला.

पंचवटी : प्लॅस्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाला होणारी हानी रोखण्यासाठी शासनाने शनिवारपासून प्लॅस्टिक वापरावर बंदी लागू केल्याने त्याचा पहिलाच फटका नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांना बसला. शेतमाल भरण्यासाठी व्यापाºयांकडे प्लॅस्टिक पिशव्या आढळून आल्याने त्याविरुद्ध महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केल्याने शनिवारी दुपारी जवळपास तासभर लिलाव बंद पडले. अखेर व्यापाºयांनी पोते तसेच पुठ्ठ्याच्या कार्टूनमध्ये शेतमाल भरण्यास सुरुवात केल्यानंतर लिलाव सुरळीतपणे चालू झाले.  नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक जिल्ह्यातून दैनंदिन शेकडो शेतकरी शेतमाल प्लॅस्टिक कॅरेटमध्ये विक्रीसाठी घेऊन येतात. लिलाव झाल्यानंतर व्यापारी फळभाज्या वेगवेगळ्या प्लॅस्टिक पिशव्यांत भरून तो चारचाकी वाहनांतून अन्य बाजारपेठेत पाठवित असतात. शासनाने प्लॅस्टिकबंदी लागू करून प्लॅस्टिक पिशव्या आढळून आल्यास जागेवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केल्याने शेतमाल भरायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  शनिवारी सकाळी बाजार समितीत काही व्यापाºयांकडे प्लॅस्टिक पिशव्या आढळून आल्याने त्यांच्यावर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आली; मात्र त्यानंतर दुपारी १२ वाजता सुरू होणारी लिलाव प्रक्रिया रखडली. यामुळे व्यापारी हतबल झाले. त्यानंतर तासभराने पुन्हा लिलाव सुरू झाले.व्यापा-यांनी मांडल्या अडचणीलिलाव झाल्यानंतर रिकामे कॅरेट शेतकºयांना परत करावे लागत असल्याने फळभाज्या कशात भरून पाठवायच्या यावरून व्यापारी हतबल झाले. त्यानंतर काही व्यापाºयांनी बाजार समिती कार्यालयात जाऊन अडचणी मांडल्या; मात्र शासन निर्णय असल्याने व त्यातच उच्च न्यायालयाने आदेश दिल्याने कोणी काही करू शकत नाही असे स्पष्ट केल्याने व्यापारी मागे फिरले त्यानंतर तासभराने म्हणजे दुपारी १ वाजता लिलाव सुरू झाले. प्लॅस्टिकबंदीमुळे व्यापाºयांनी प्लॅस्टिक पिशव्याऐवजी पोते तसेच पुठ्ठ्याच्या कार्टूनमध्ये शेतमाल भरून अन्य बाजार समितीत रवाना केला.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी