शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभाग घेणार सेवानिवृत्तांची मदत : अपुरे मनुष्यबळ

By admin | Updated: April 2, 2017 21:06 IST

सन २०१२ पासून नवीन कर्मचारी भरती करण्यात आली नसल्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाला अपुऱ्या मनुष्यबळावर कामकाज करावे लागत आहे.

नाशिक : सन २०१२ पासून नवीन कर्मचारी भरती करण्यात आली नसल्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाला अपुऱ्या मनुष्यबळावर कामकाज करावे लागत आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मदत घेण्याचे ठरविले आहे. शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने नियुक्ती देण्यात येणार आहे. नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार अशा चार जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात मोठ्या प्रमाणात कामकाज चालते. इयत्ता पहिली ते १२ वी पर्यंतच्या शालेय शिक्षणाबाबत शासकीय धोरणांची अंमलबजावणी करणे, शैक्षणिक समन्वयक, संच, शाळा व शिक्षक मान्यता देणे, तसेच अध्यापक विद्यालयांची कार्यवाही करणे आदि कामकाज या कार्यालयामार्फत चालते. शैक्षणिक कामकाजासंदर्भातील संगणकीय कामे तसेच न्यायालयीन कामे आणि इतर कामांचाही मोठा ताण या कार्यालयात असतो. परंतु कमी मनुष्यबळावरच येथील कर्मचाऱ्यांना कामकाज करावे लागते. विशेषत: शैक्षणिक वर्ष सुरू होताना कार्यालयात चारही जिल्ह्यांतून कामकाजाचा मोठा ताण वाढतो. तसेही वर्षभर अनेक महत्त्वाची कामे सुरूच असतात. मात्र कमी मनुष्यबळ असल्याने वेळेत कामे पूर्ण करण्याच्याही अडचणी निर्माण होत असतात. ही बाब लक्षात घेऊन शासनाच्या तरतुदीनुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयाने करार पद्धतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नियुक्तीसाठीचे आवाहन केले आहे. शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त सहा महिन्यांच्या करारावर सेवेसाठी घेतले जाणार आहे. या कर्मचाऱ्यांना संबंधित विभागाच्या कामकाजाचा अनुभव असल्याने कामकाज करणे सुलभ होते असल्याने शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झालेल्यांना काम करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते.