Ashok Kharat : ४ वर्षांपूर्वी अशोक खरातने दिलेला मंदिर पाडण्याचा अजब सल्ला; वावीकरांचा शहाणपणा ठरला फायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 13:07 IST2026-03-27T13:05:59+5:302026-03-27T13:07:33+5:30
Ashok Kharat : वावी येथील ऐतिहासिक वैजेश्वर मंदिर पाडण्याचा अजब सल्ला देणाऱ्या अशोक खरात याचा तो अजब सल्ला ग्रामस्थांनी वेळेत धुडकावून लावत वेळीच शहाणपणा दाखवल्याची भावना आता व्यक्त होत आहे.

Ashok Kharat : ४ वर्षांपूर्वी अशोक खरातने दिलेला मंदिर पाडण्याचा अजब सल्ला; वावीकरांचा शहाणपणा ठरला फायदेशीर
नाशिक : सिन्नर तालुक्यातील वावी येथील ऐतिहासिक वैजेश्वर मंदिर पाडण्याचा अजब सल्ला देणाऱ्या अशोक खरात याचा तो अजब सल्ला ग्रामस्थांनी वेळेत धुडकावून लावत वेळीच शहाणपणा दाखवल्याची भावना आता व्यक्त होत आहे. चार वर्षांपूर्वी घडलेली ही घटना भोंदू खरतच्या अटकेनंतर पुन्हा चर्चेत आली आहे.
सिन्नर तालुक्यातील वाती येथे ११३९ सालात उभारण्यात आलेले पुरातन वैजेश्वर मंदिर धार्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. चार वर्षापूर्वी या मंदिरातील शिवलिंग आता क्षीण झाल्याचे सांगत खरातने मंदिर पाडून टाकण्याचा अजब सल्ला ग्रामस्थांना दिला होता. मात्र केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणाखाली असलेल्या या मंदिराबाबत कोणताही हस्तक्षेप केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, याची जाणीव ठेवत ग्रामस्थांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने काही तरुणांनी खरातला बोलावले होते. मात्र त्याने उलट मंदिर पाडण्याचा सल्ला दिल्याने उपस्थितांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
भोंदू अशोक खरात आता ईडी, फॉरेक्सच्याही रडारवर; विदेश दौऱ्यांची, व्यवहारांची चौकशी होणार
अशोक खरातचा पिस्तूल परवाना रद्द; फार्महाऊसवर सापडली २१ काडतुसं, ८ गुन्हे दाखल
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, त्या वेळी खरात मोबाईलवरील एका एपच्या माध्यमातून विचित्र भाषेत प्रश्न विचारत होता आणि मिळालेल्या उत्तरांवरून मंदिर 'गावासाठी घातक' असल्याचा दावा करत होता. दरम्यान, खरात याला अलीकडेच गंभीर गुन्ह्यात अटक झाल्यानंतर वावीतील ही जुनी घटना पुन्हा चर्चेत आली आहे.
"... तर तुझा मृत्यू अटळ", भोंदूबाबा अशोक खरातने थेट तुर्कस्थानातून मागवलं ९० लाखांचं फर्निचर
स्वतःच्या ईशान्येश्वर मंदिराचे महत्त्व वाढवण्यासाठीच त्याने असा सल्ला दिला होता, असा आरोपही ग्रामस्थांकडून प्रसारमाध्यमासमोर केला गेला. त्या वेळी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला असता, तर गावातील ऐतिहासिक वारसा धोक्यात आला असता, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. 'आपण त्या भानगडीत पडलो नाही, हेच बरे झाले, असे म्हणत वावीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.