Ashok Kharat Nashik: अशोक खरात प्रकरणात आता तपास अधिक गूढ होत चालला असून खरातच्या मोबाइलमधून उघड झालेल्या माहितीमुळे तपास यंत्रणांच्या हातात महत्त्वाचे धागेदोरे आले आहेत. खरातच्या मोबाइलमध्ये तब्बल अडीच हजारांहून अधिक फोन नंबर सेव्ह आहेत. मात्र, या नंबरपैकी अनेक नंबर 'कोडवर्ड'मध्ये सेव्ह करण्यात आले असून त्याचा अर्थ उलगडणे हे तपास पथकासमोर आव्हान ठरले आहे.
काही राजकीय तसेच प्रभावशाली व्यक्तींची नावे 'डमी' स्वरूपात सेव्ह करण्यात आल्याचा संशय आहे. दुसरीकडे, पीडित महिलांचे नंबर मात्र जाणूनबुजून मुख्य मोबाइलमध्ये सेव्हच न करण्याची काळजी खरात घेत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी तो वेगळ्या मोबाइलचा वापर करत होता एसआयटीचे तपास अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी न्यायालयात सांगितले की, खरातच्या मोबाइलची क्लोन कॉपी मिळाली असून त्याचे सखोल विश्लेषण अद्याप बाकी आहे. आरोपीच्या उपस्थितीत डेटा तपासला जाणार असल्याने आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
राजकीय कनेक्शनची पडताळणी
तपासात राजकीय कनेक्शनची शक्यता नाकारता येत नसल्याने या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. खरातचे दोन मोबाइल जप्त करण्यात आले असून त्यातील डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे.
तपासाचा भाग म्हणून खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव याच्या मोबाइलचीही पडताळणी करण्यात येत आहे. त्याच्या आणि खरातच्या मोबाइलमधील संपर्क क्रमांक एकमेकांशी जुळतात का, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
Web Summary : Ashok Kharat case deepens. His phone contains coded numbers, possibly for influential figures. He used a separate phone for female contacts. Police are investigating political connections.
Web Summary : अशोक खरात मामले में गहराती जांच। उसके फोन में कोडित नंबर, प्रभावशाली व्यक्तियों के लिए हो सकते हैं। महिलाओं से संपर्क के लिए अलग फोन का उपयोग। राजनीतिक कनेक्शन की जांच जारी।