Ashok Kharat Case:"तुम्ही 'बीजेपी'मध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथे या..."; बच्चू कडू यांनीही घेतली होती अशोक खरातची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 13:48 IST2026-03-24T13:32:09+5:302026-03-24T13:48:00+5:30

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली असून आता माजी आमदार बच्चू कडू यांनीही खरात याची भेट घेतल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Ashok Kharat case When you are a minister in BJP, you come here Bachchu Kadu also had a darshan of Ashok Kharat, video is going viral | Ashok Kharat Case:"तुम्ही 'बीजेपी'मध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथे या..."; बच्चू कडू यांनीही घेतली होती अशोक खरातची भेट

Ashok Kharat Case:"तुम्ही 'बीजेपी'मध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथे या..."; बच्चू कडू यांनीही घेतली होती अशोक खरातची भेट

Ashok Kharat Case :  नाशिक येथील अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. खरात याने अनेक महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत सहा गुन्हे दाखल झाले आहेत. एका विद्यार्थीनीचाही छळ केल्याचे उघड झाले आहे.  अशोक खरात अनेक राजकीय नेत्यांच्याही संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. आता माजी आमदार बच्चू कडू यांनीही एकदा अशोक खरात याची भेट घेतल्याचे समोर आले आहे. अशोक खरात याचा आणि बच्चू कडू यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Ashok Kharat Case : संतापजनक! अशोक खरातचे विद्यार्थिनींशीही गैरवर्तन; ६ गुन्हे दाखल, एसआयटीने तपास वाढवला

या व्हिडीओमध्ये अशोक खरात बच्चू यांच्यासोबत इंग्रजीमध्ये संवाद साधत असल्याचे दिसत आहे. 'I would like to say, मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची आहे, जेव्हा तुम्ही भाजपमध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथे या", असे खरात या व्हिडीओमध्ये बोलत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत शेवटी बच्चू  कडू अशोक खरात याच्या पाया पडत असल्याचे दिसत आहेत. 

दरम्यान, अशोक खरात याची आज पोलिस कोठडी संपणार आहे. त्याला आज नाशिकच्या जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. खरात याच्या विरोधात एकूण ६ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून काल ३ महिलांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती एसआयटी ने दिली आहे. 


भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. खरात याचा तपास आणखी वाढवला आहे, त्याच्याविरोधात आता तक्रारी देण्यासाठी महिला पुढे येत आहेत. या आधी फक्त तीनच गुन्हे दाखल होते, आता आणखी तीन गुन्हे दाखल झाले आहेत. काल नव्याने तीन तक्रारी झाल्या असून यामध्ये एका विद्यार्थीनीचा समावेश आहे.अशोक खरात याने एका विद्यार्थीनीवरही अत्याचार केल्याचे आता उघड झाले आहे. यामुळे आता संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title : अशोक खरात मामला: मंत्री से मुलाक़ात की मांग, बच्चू कडू की मुलाक़ात का खुलासा।

Web Summary : अशोक खरात मामले, जिसमें यौन उत्पीड़न के आरोप हैं, में तेजी आई है। एक छात्रा के साथ दुर्व्यवहार सहित छह मामले दर्ज किए गए हैं। एक वीडियो में खरात बच्चू कडू के साथ दिख रहे हैं, जहाँ खरात ने कडू के मंत्री होने पर मुलाक़ात का अनुरोध किया। वीडियो में कडू को खरात के सामने झुकते हुए देखा गया। खरात की पुलिस हिरासत आज खत्म हो रही है।

Web Title : Ashok Kharat Case: Minister visit demand, Bachchu Kadu's meeting revealed.

Web Summary : The Ashok Kharat case, involving allegations of sexual assault, has intensified. Six cases are filed, including student abuse. A video shows Kharat with Bachchu Kadu, where Kharat requests a visit when Kadu is a minister. Kadu was seen bowing to Kharat in the video. Kharat's police custody ends today.