शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कलिंगडचे आगमन; मागणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 19:23 IST

उन्हाची तीव्रता व असह्य उष्णतामान या पार्श्वभूमीवर कलिंगडाचा वापर वाढला आहे. मुंबई भागातील डहाणू, पालघर या खाडीपट्यात मोठ्या प्रमाणावर कलिंगडाचे उत्पादन घेण्यात येते. त्याबरोबर अलिबाग परिसरातही कलिंगड उत्पादनाचा नावलौकिक आहे.

वणी : उन्हाची तीव्रता व असह्य उष्णतामान या पार्श्वभूमीवर कलिंगडाचा वापर वाढला आहे. मुंबई भागातील डहाणू, पालघर या खाडीपट्यात मोठ्या प्रमाणावर कलिंगडाचे उत्पादन घेण्यात येते. त्याबरोबर अलिबाग परिसरातही कलिंगड उत्पादनाचा नावलौकिक आहे.मातीमिश्रित वाळूमध्ये कलिंगडाची लागवड करण्यात येते. प्रामुख्याने दमट व शितोष्ण हवामान यास या पिकाला अनुकूल आहे. ६ बाय ४ इंचच्या अंतरात १११० ते १३०० वेलीची लागवड करण्यात येते. नामधारी व किरण अशा जातीच्या लागवडीकडे उत्पादकांचा विशेष कल असतो. इतर जातीच्या कलिंगडाच्या तुलनेत या जातीचे उत्पादन अधिक होते अशी उत्पादकांची भावना आह.े फळ पक्कतेसाठी १०० ते १२० दिवसाचा कालावधी लागतो.याबरोबर रासायनिक प्राक्रि यांचा वापर केल्यास यापेक्षा कमी दिवसात फळ परिपक्व होते. लागवडीच्या वेळी कुजलेले शेणखत अंदाजे २५ गाड्या एका एकरासाठी वापरण्यात येता. तसेच नत्र, स्फुरद व पालाश या रासयानिक खतांचाही वापर करण्यात येतो. चांगली निचरा होणारी व वापरात असणारी जमीन यास आवश्यक असते. कलिंगडाचे वजन दोन ते दहा किलो आकारमानावर अवलंबून असते.एका वेलीस अंदाजे २ ते ३ कलिंगड येतात. म्हणजे अंदाजे २२०० ते २८०० कलिंगडे एका एकरात उत्पादित होतात. कलिंगड उत्पादनाचा एकरी खर्च सुमारे ५० हजारांच्या जवळपास येतो. त्या तुलनेत अंदाजे एक लाखाच्या पुढे उत्पन्न मिळते. दरम्यान डहाणू, पालघर अलिबाग या पट्यातुन टनाच्या हिशोबाने घाऊक व्यापारी कलिंगडाची खरेदी करतात तद्नतर स्थानिक बाजारपेठमधे नगावर कालिंगडाची विक्र ी करण्यात येते.रस्त्यालगत आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची विक्र ी करण्यासाठी दुकाने थाटण्यात येतात कलिंगडाला जास्त पाण्याची आवश्यकता नसते तसेच ठिबक सिंचनाच्या माध्यमातुनही उत्पादने घेण्याकडे उत्पादकाचा कल असतो फळाचा आकार व रंग यावर फळाच्या परिपक्कतेचा अंदाज येतो दिर्घकाळ टिकणारे फळ म्हणुन कलिंगडाची ओळख असुन दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्यात काही वर्षापूर्वी कलिंगड उत्पादनाचा उपक्र म राबविला होता मात्र पर्यायी उत्पादनाच्या माध्यमातुन तुलनात्मक समाधानकारक अर्थप्राप्ती मुळे हे उत्पादन घेणे बंद झाल्याची माहिती जाणकारांनी दिली. उत्पादकांना कलिंगड खरेदी विक्र ीसाठीचे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समतिी पारदर्शी व सोयीचे माध्यम असून येथेही मोठी आर्थिक उलाढाल होते उष्णतामानाचा सामना करण्यासाठी बहुविविध पर्याय उपलब्ध आहेत मात्र कलिंगडाचे आकर्षण अशा वातावरणात सर्वानाच असते ते कालिंगडाच्या दुकानातील विक्र ी व्यवहाराच्या गतिमानतेतुन दिसुन येते

टॅग्स :Nashikनाशिकweatherहवामान