शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी स्ट्रॉँगरूमसमोर सशस्त्र पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 22:40 IST

मालेगाव : मालेगाव बाह्य व मध्य मतदारसंघाची मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, गुरुवारी दुपारी २ वाजेपर्यंत मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य मतदारसंघांचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकडक बंदोबस्त : दुपारी २ पर्यंत अंतिम निकाल येण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : मालेगाव बाह्य व मध्य मतदारसंघाची मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, गुरुवारी दुपारी२ वाजेपर्यंत मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य मतदारसंघांचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.उद्या गुरुवारी (दि. २४) मालेगाव मध्यची छत्रपती शिवाजी महाराज जिमखाना येथे, तर बाह्य मतदारसंघाची वखार महामंडळाच्या गुदामात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणी कक्षात टेबल, खुर्च्या लावण्यात आल्या आहेत. तर स्ट्रॉँगरूम बाहेर पोलिसांचा सशस्र बंदोबस्त चोवीस तास तैनात करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मालेगाव बाह्य मतदारसंघात ३०८ मतदान केंद्रांद्वारे मतदान घेण्यात आले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५९.३५ टक्के मतदान झाले. तीन लाख ४० हजार ९११ मतदारांपैकी दोन लाख दोन हजार ३१९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात एक लाख १० हजार ५७ पुरुष, तर ९२ हजार २६१ महिला मतदारांचा समावेश होता. मतदान यंत्रे पोलीस बंदोबस्तात स्ट्रॉँगरूममध्ये ठेवण्यात आली आहेत. उद्या, गुरुवारी मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मध्य व बाह्य मतदारसंघात सकाळी ८ वाजता टपाली मतदानापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. यासाठी प्रत्येकी दोन्ही मतदारसंघासाठी १४ टेबल लावण्यात आले आहेत. एका टेबलवर चार अशा १५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २३ फेऱ्यांमध्ये अंतिम निकाल हाती येण्याची शक्यताआहे. दुपारी २ पर्यंत निकाल लागणार आहे. प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, मालेगाव मध्यचे निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा, बाह्यचे निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ यांनी वरिष्ठ निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत रिंगणातील उमेदवारांच्या तक्रारी जाणून घेतल्या. तरुणाविरुद्ध मतदान गोपनीयता भंगचा गुन्हामालेगाव बाह्य मतदारसंघातील चंदनपुरी येथील मतदान केंद्र क्र. २९५ मध्ये मतदान चालू असताना मतदान केंद्रामध्ये भ्रमणध्वनी घेऊन जाऊन मतदानाचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी भरत प्रकाश शेलार, रा. चंदनपुरी या तरुणाविरुद्ध किल्ला पोलीस ठाण्यात मतदान गोपनीयतेचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी निवडणूक केंद्रप्रमुख मुश्ताक अहमद अब्दुल कादीर यांनी छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली होती. मिसळ यांनी गंभीर दखल घेत संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केंद्रप्रमुखांना दिल्या होत्या.मालेगाव बाह्य मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रजित राजपूत यांनी मंगळवारी वखार महामंडळाच्या गुदामातील स्ट्रॉँगरूमची पाहणी करून सुरक्षिततेचा आढावा घेतला. उपस्थित सुरक्षा अधिकाºयांना सूचना केल्या. तसेच मतमोजणी प्रक्रियेच्या तयारीचा आढावा घेतला.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019