शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी कंपनीवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

By admin | Updated: April 30, 2017 02:02 IST

नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कंपनीच्या संचालक मंडळावर महापालिकेतील नवनिर्वाचित पदाधिकारी यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

 नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या एसपीव्ही अर्थात नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीच्या संचालक मंडळावर महापालिकेतील नवनिर्वाचित पदाधिकारी यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. याशिवाय, कंपनीसाठी विविध पदांच्या भरतीची प्रक्रिया तातडीने राबविण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत.दहा महिन्यांपूर्वी स्मार्ट सिटी कंपनी स्थापन करण्यात येऊन तिची नोंदणी करण्यात आली होती. या कंपनीवर मागील पंचवार्षिक काळातील पदसिद्ध म्हणून महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, सभागृहनेता सुरेखा भोसले, स्थायी समिती सभापती सलीम शेख व विरोधी पक्षनेता कविता कर्डक यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, नाशिक महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. त्यामुळे कंपनीच्या संचालक मंडळावर नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव शनिवारी (दि.२९) झालेल्या एसपीव्हीच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. त्यानुसार, नवनिर्वाचित महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येऊन त्यांचा कुंटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कंपनीसाठी अभियंता, कंपनी सेक्रेटरी, मुख्य लेखाधिकारी, आयटी प्रमुख, आदिंच्या नियुक्यांबाबतही चर्चा करण्यात आली. त्यासाठी वेगवेगळे पर्याय समोर आले. सदर पदे ही अनुभवी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांमधून भरणे अथवा खुल्या पद्धतीने जाहिरात काढून भरती करणे याबाबतचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले.