वार्षिक गुणगौरव उत्साहात

By Admin | Updated: January 20, 2017 22:46 IST2017-01-20T22:46:11+5:302017-01-20T22:46:40+5:30

वार्षिक गुणगौरव उत्साहात

Annual Quality Score | वार्षिक गुणगौरव उत्साहात

वार्षिक गुणगौरव उत्साहात

सिन्नर : येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सिन्नर महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ‘शहिदांसाठी जगणं’ या कार्यक्रमाद्वारे शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले. मविप्रचे संचालक कृष्णाजी भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर डॉ. यशवंत पाटणे, नगरसेवक गोविंद लोखंडे, नारायण वाजे, दामोदर गाडे, डॉ. भरत गारे, प्राचार्य डॉ. श्रीमती जे. डी. सोनखासकर, आर. के. मुंगसे आदि मान्यवर उपस्थित होते. सिन्नर महाविद्यालयातून अनेक माजी विद्यार्थी सैन्यदलात भरती झाले आहेत. संदीप ठोक व राजेंद्र उगले या माजी विद्यार्थ्यांना देशसेवा करीत असताना वीरमरण आले. त्यांच्या हौतात्म्याचे स्मरण करून ‘शहिदांसाठी जगणं’ या कार्यक्रमाद्वारे शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
डॉ. एस. एन. पगार, तुषार बोरकर, व्ही. डी. गोळेसर, एस. डी. जाधव यांनी बक्षीस वितरण यादीचे वाचन केले. यावेळी विविध क्षेत्रात नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. डॉ. राहुल पाटील व सी. जे. बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्नेहसंमेलन प्रमुख डॉ. एस. एस. पगार, उपप्राचार्य आर. व्ही. पवार, टी. बी. खालकर, ए. एस. गुरुळे, शकुंतला गायकवाड, डॉ. आशालता सोनवणे आदिंनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)













 

Web Title: Annual Quality Score