शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

अनकुटे ग्रामपंचायतीत सरपंच पदाचे रंगले राजीनामा नाट्य

By admin | Updated: September 15, 2016 00:17 IST

अनकुटे ग्रामपंचायतीत सरपंच पदाचे रंगले राजीनामा नाट्य

 येवला : अनकुटे ग्रामपंचायतीत सरपंच पदाचे राजीनामा नाट्य रंगले मात्र मंगळवारी या नात्यावर पडदा पडला. अनकुटे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसाधारण असुन जिजाबाई माधव गायकवाड ह्या सरपंच आहे. आवर्तन पद्धतीमुळे त्यांची सरपंच पदाची मुदत संपल्याने त्यांच्यावर राजीनाम्या करिता दबाव आणुन त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याची माहिती आहे.राजीनामा सत्यता पडताळणीसाठी ग्रामपंचायतकडे पाठविण्यात आला. व त्यासाठी ९ सप्टेंबर ला सभा बोलविण्यात आली. परंतु त्या दिवशी राजीनाम्याची सत्यता पडताळणी सभेस केवळ ३ सदस्य हजर होते. शिवसेनेचे माजी सरपंच अ‍ॅड. बापु गायकवाड यांच्यासह इतर ८ सदस्य बाबासाहेब पवार, वाल्मीक तळेकर, उज्वला बोंबले, सविता पवार, सरपंच जिजाबाई गायकवाड, देटके, गोरे हे गैरहजर राहीले व त्यामुळे कोरम पुर्ण होवू शकला नाही.त्यामुळे राजीनामा सत्यता पडताळणी करता आली नाही. तेव्हा सत्ताधा-यांवर अल्पमताची नामुष्की ओढवली गेली. या कामासाठी दुसरी सभा १३ सप्टेंबर मंगळवारी बोलवण्यात आली. दरम्यान राजकीय वातावरण चांगलेच तापले. सरपंच व सत्ताधारी यांच्यात कलगीतुरा रंगला व बाचाबाची, शिवीगाळ इथपर्यंत प्रकरण पोहचले. मंगळवार १३ सप्टेंबर रोजी सभेच्या दिवशी सरपंचानी सभा सुरु होताच राजीनामा मान्य नसल्याचे सांगुन लेखी पत्र ग्रामसेवक योगिता निरभवणे यांच्याकडे दिले. त्यात मी निरक्षर असुन मला वाचता व लिहीता येत नाही राजीनाम्याची मला कोणतीही पुर्व कल्पना नव्हती. तो माझा राजीनामा आहे हे मला कळलेच नाही मला ग्रामसेवकानी राजीनामा असल्याचे सांगितले त्यामुळे राजीनामा मला अमान्य आहे. मी राजीनामा म्हणून कोणताही कागद दिला नाही त्यामुळे माझा राजीनामा नामंजुर करण्यात यावा. सरपंच यांच्या पत्रामुळे व सभेत राजीनामा मान्य नाही असे सांगितल्यामुळे राजीनामा नामंजुर करण्यात आला. व अखेर त्यावर पडदा पडला. (वार्ताहर)