संगीनी महिला संस्थेच्या संस्थापक अनिता पगारे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 01:01 PM2021-03-28T13:01:36+5:302021-03-28T13:03:19+5:30

पगारे यांनी महिलांसह युवा वर्गासाठी विविधप्रकारे सामाजिक कार्य केले आहे. पगारे यांनी कला शाखेतून राज्यशास्त्र विषयात पदवी मिळविली होती. तसेच मास्टर इन सोशल वर्क-फॅमिली चाईल्ड वेल्फेअर (एमएसडब्ल्यू) चीही पदवी त्यांनी घेतली होती.

Anita Pagare, founder of Sangini Mahila Sanstha, passed away | संगीनी महिला संस्थेच्या संस्थापक अनिता पगारे यांचे निधन

संगीनी महिला संस्थेच्या संस्थापक अनिता पगारे यांचे निधन

Next
ठळक मुद्देशिकमध्ये महिला हक्क संरक्षण समितीवर कार्यरत होत्याकौटुंबिक समुपदेशक व सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळख

नाशिक : पुरोगामी विचारांच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या संगीनी महिला जागृती मंडळ संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष अनिता पगारे (५०) यांचे रविवारी (दि.२८) निधन झाले. त्यांच्या निधनाने पुरोगामी संघटनांकडून हळहळ व्यक्त होत आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यासोबतही त्यांनी काम केले आहे.
नाशिक शहरातील चेतनानगर येथील रहिवासी असलेल्या अनिता पगारे यांचे अल्पशा आजाराने अचानकपणे निधन झाले. पगारे यांनी महिलांसह युवा वर्गासाठी विविधप्रकारे सामाजिक कार्य केले आहे. पगारे यांनी कला शाखेतून राज्यशास्त्र विषयात पदवी मिळविली होती. तसेच मास्टर इन सोशल वर्क-फॅमिली चाईल्ड वेल्फेअर (एमएसडब्ल्यू) चीही पदवी त्यांनी घेतली होती.
१९९०-९९ साली पगारे या नाशिकमध्ये महिला हक्क संरक्षण समितीवर कार्यरत होत्या. कौटुंबिक समुपदेशक व सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांनी यावेळी महिलांच्य न्यायहक्कासाठी लढा दिला होता. २०१९ साली कम्युनिटी डेव्हलपमेंट मोखाडा-जव्हार ब्लॉक हा प्रोजेक्ट राबविला होता. या प्रकल्पासाठी त्यांना ह्यओरेहनह्ण संस्थेच्या वतीने जबाबदारी सोपविण्यात आली होती. या प्रकल्पाच्या त्यांनी व्यवस्थापक म्हणून काम बघितले होते. यानंतर अल्पवयीन मुले, तरुण, पदव्युत्तर पदवी घेणारे विद्यार्थी यांच्या समुपदेशनासाठी त्यांनी विविध उपक्रमही राबिवले होते.
२०१५-२०१६साली विश्वास ज्ञान प्रबोधिनी व रिसर्च सेंटरच्या वतीने समन्वयक म्हणून पगारे यांनी युवकांसाठी कार्य केले होते. तत्पुर्वी २००६-२००८साली पगारे यांनी राज्य सरकारच्या महिला व बालकांच्या विशेष सेलमध्ये समन्वयक म्हणून काम केले होते. २००१-२००२ साली रेशनिंग कृती समितीच्या संशोधन प्रकल्पामध्येही पगारे यांचा सहभाग होता.
पगारे यांना १९९८साली यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई,च्या वतीने नवभारत युवा आंदोलनांतर्गत राज्यस्तरीय 'युवा पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले होते. नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण अकादमीमध्ये त्यांनी महिलांविषयक कायदे या विषयावर व्याख्याता म्हणून प्रशिक्षणार्थीं पोलीसांना धडे दिले. त्यांच्या अशा अचानकपणे झालेल्या निधनाने शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती मनोहर अहिरे व कन्या कल्याणी आणि किर्ती  असा परिवार आहे.

Web Title: Anita Pagare, founder of Sangini Mahila Sanstha, passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.