नाशकात भुजबळ फार्म परिसरात घरफोडी, तीन लाखांच्या ऐवज चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 17:28 IST2023-04-07T17:28:02+5:302023-04-07T17:28:27+5:30
नाशिकमध्ये भुजबळ फार्म परिसरात घरफोडी झाल्याची घटना घडली.

नाशकात भुजबळ फार्म परिसरात घरफोडी, तीन लाखांच्या ऐवज चोरी
नरेंद्र दंडगव्हाळ
नाशिक : बंद घराचा दरवाजाची कडी कोयंडा व कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करीत तीन लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व तांब्या पितळेचे व इलेक्ट्रॉनिक आदीवस्तू चोरून नेल्याची घटना भुजबळ फार्म परिसरात घडली आहे. या प्रकरणी अंबज पोलिस ठाण्यात गुरुवारी संजय रमेश तेले यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय रमेश तेले (५३ अंकुर कोशिका नगर , भुजबळ फार्म सिडको नाशिक) हे दि.०१ ते ४ एप्रिल रोजी कामानिमित्त बाहेर गेले असताना त्यांच्या बंद घराचा दरवाज्याचा कडी कोयना तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत तीन लाख चार हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने सह तांब्या पितळाच्या व इलेक्ट्रॉनिक आदि वस्तू घरफोडी करत चोरून नेल्या याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत खतेले अधिक तपास करीत आहेत.