वाद झाला अन् दारूच्या नशेत असलेल्या मुलाने बापाच्या पोटात खुपसला चाकू, नाशिकमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 18:24 IST2026-03-19T18:24:16+5:302026-03-19T18:24:58+5:30

पित्याचा खून केल्याच्या कारणावरून पोलिसांनी अश्विन सखाराम भावसारला अटक केली आहे.

An argument broke out and a drunk son stabbed his father in the stomach, incident in Nashik | वाद झाला अन् दारूच्या नशेत असलेल्या मुलाने बापाच्या पोटात खुपसला चाकू, नाशिकमधील घटना

वाद झाला अन् दारूच्या नशेत असलेल्या मुलाने बापाच्या पोटात खुपसला चाकू, नाशिकमधील घटना

Nashik crime: कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादातून रागाच्या भरात पेठ रोडवरील नवनाथनगरला राहणाऱ्या पोटच्या ३५ वर्षीय मुलाने ६५ वर्षीय वृद्ध पित्याच्या पोटात धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते. सव्वा महिन्याभरापूर्वी घडलेल्या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या पित्याचा उपचार सुरू असताना मंगळवारी (१७ मार्च) मृत्यू झाल्याने मुलावर पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सखाराम पंडित भावसार (६५) असे चाकू हल्ल्यात जखमी होऊन मृत्यू पावलेल्या वृद्ध पित्याचे नाव आहे. पित्याचा खून केल्याच्या कारणावरून पोलिसांनी अश्विन सखाराम भावसारला अटक केली आहे. ५ फेब्रुवारी रोजी दुपारी रोकडे चाळ येथे राहणाऱ्या दोघा भावसार पिता-पुत्रात कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. 

त्यावेळी दारूच्या नशेत संशयित आरोपी अश्विन याने वडील सखाराम यांना शिवीगाळ करत हातातील धारदार चाकूने पोटात डाव्या बाजूला वार केला. त्यात सखाराम गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.

Web Title : नाशिक: नशे में बेटे ने पिता को चाकू मारा, मौत

Web Summary : नाशिक में पारिवारिक विवाद के बाद एक 35 वर्षीय व्यक्ति ने शराब के नशे में अपने 65 वर्षीय पिता को चाकू मार दिया। उपचार के दौरान पिता की मौत हो गई, जिसके बाद बेटे को हत्या के आरोप में गिरफ्तार कर लिया गया।

Web Title : Drunk Son Stabs Father to Death in Nashik After Argument

Web Summary : In Nashik, a 35-year-old man fatally stabbed his 65-year-old father after a family argument fueled by alcohol. The father succumbed to his injuries after a month of treatment. The son has been arrested for murder.