शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात अमर, अकबर, अ‍ॅँथनीचे सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:05 IST

राज्यात सध्या अमर, अकबर, अ‍ॅँथनीचे सरकार असून, हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी टीका केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केली. नाशिक शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ठळक मुद्देरावसाहेब दानवे : साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद जुनाच

नाशिक : राज्यात सध्या अमर, अकबर, अ‍ॅँथनीचे सरकार असून, हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी टीका केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केली. नाशिक शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी बोलताना दानवे म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने गत पाच वर्षांत राज्यात विविध विकासकामे सुरू केली आहेत, मात्र राज्यात नव्याने स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार या कामांना स्थगिती देत आहे. केंद्र सरकारने केलेला नागरिकत्व संशोधन कायद्याविषयी विरोधक नागरिकांच्या मनात गैरसमज निर्माण करून त्यांची दिशाभूल करीत आहेत.स्वातंत्र्याच्या वेळी पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये असलेली हिंदूंची संख्या आणि आजची संख्या यात मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाली आहे. अशा नागरिकांना नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. यामुळे हा कायदा नागरिकत्व हिरवणारा नव्हे, तर नागरिकत्व देणारा कायदा आहे. भाजपच्या मुस्लीम कार्यकर्त्यांनाही हे समजले आहे, असे सांगतानाच दानवे यांनी भाजपच्या मुस्लीम कार्यकर्त्यांनी दिलेल्या राजीनाम्यांबाबत अनभिज्ञता दर्शविली.केंद्र सरकारने काश्मीरबाबतचे ३७० कलम रद्द केल्याने देशभरात समाधानाचे वातावरण आहे. काश्मिरी जनतेच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी केंद्रातील मंत्री काश्मीरमध्ये जाणार असून, तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सरकारसमोर मांडण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.चंद्रकांत खैरे यांना दिले आव्हानकर्नाटक आणि महाराष्टÑ सीमा प्रश्नाबाबत बोलताना त्यांनी भाजप सीमावासीयांच्या बाजूने असल्याचे सांगितले. राजूर संस्थानच्या जमिनीच्या प्रश्नावर, मी कोणती जमीन बळकावली हे चंद्रकांत खैरे यांनी सिद्ध करावे, असे आव्हान दानवे यांनी दिले. खैरे यांचा पराभव झाल्यानेच ते असे आरोप करत असल्याचेही त्यांनी म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या नाइट लाइफ प्रस्तावाला त्यांनी विरोध दर्शविला, तर साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद जुनाच असल्याचे सांगून हा प्रश्न राज्य सरकारने सोडवायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Politicsराजकारण