नाशिक पोलिसांकडून जप्त केलेल्या २२ लाख ९१ हजाराच्या मुद्दमालाचे फिर्यांदींना केले वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 15:41 IST2019-05-30T15:37:48+5:302019-05-30T15:41:29+5:30

 नाशिक पोलीस आयुक्तालयांच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखा एक व दोन व मध्यवर्ती युनीटचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. ३० )  संबधित फिर्यादी/तक्रारदारांना वाटप करण्यात आले.

Allotment of 22 lakh 9 thousand thousand of the people seized by Nashik Police has been allotted to the judges | नाशिक पोलिसांकडून जप्त केलेल्या २२ लाख ९१ हजाराच्या मुद्दमालाचे फिर्यांदींना केले वाटप

नाशिक पोलिसांकडून जप्त केलेल्या २२ लाख ९१ हजाराच्या मुद्दमालाचे फिर्यांदींना केले वाटप

ठळक मुद्देपोलिसांनी केला होता २२ लाख ९१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत ८ फिर्यादींच्या मिळाले त्यांचे ६ लाख ६१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने परतचोरी गेलेल्या वस्तु परत मिळाल्याने नाशिककरांनी मानले पोलिसांचे आभार

नाशिक :   पोलीस आयुक्तालयांच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखा एक व दोन व मध्यवर्ती युनीटचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. ३० )  संबधित फिर्यादी/तक्रारदारांना वाटप करण्यात आले.
पोलीसांनी गेल्या काही दिवसांमध्ये केलेल्या कारवायांमध्ये तब्बल २२ लाख ९१ हजार  २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगेत केला होता. यात ८ फिर्यादींच्या ६ लाख ६१ हजार रुपयांच्या सोन्यांच्या दागिन्यांसह जवळपास १५ लाख २५ हजार रुपये किंमचीच्या २३ मोटार सायकल ६ फिर्यादींचे जवळपास ६८ हजार रुपये किंमतीचे मोबाईल फोन , तसेच इतर चोरीच्या घटनांमधील चोरीची रक्कम २० हजार दोनशे रुपये असा एकू ण २२ लाख ९१ हजार दोनशे रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी संबधित प्रकरणारीत फिर्यादी यांना  वाटप केला आहे. पोलिसांनी विविध कारवायांमध्ये जप्त केलेल्या मुद्दमेमालाचे वाटप करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसानी दिले  होते. त्यानुसार गुरुवारी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात झालेल्या पोलिसांनी हस्तगत केलेल्या मुद्देमालाचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते संबंधित प्रकरणातील फियार्दींना वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त  पौर्णिमा चौगुले,  अमोल तांबे, लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे,  सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील  आदि उपस्थित होते. दरम्यान, विविध प्रकरणातील फिर्यादींनी त्यांचा मुद्देमाल त्यांना परत मिळाल्याने समाधान व्यक्त करीत पोलिसांचे आभार मानले.
 

Web Title: Allotment of 22 lakh 9 thousand thousand of the people seized by Nashik Police has been allotted to the judges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.