युतीमुळे आघाडीचीही यादी लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 01:12 AM2019-09-25T01:12:51+5:302019-09-25T01:13:22+5:30

निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात आउटगोइंग झालेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या राज्यव्यापी दौऱ्यात अन्य पक्षातून इनकमिंग होण्यास सुरुवात झाली असून, अन्य पक्षातून येणाऱ्यांची संख्या पाहता त्यातून काहींना विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

 The alliance also prolonged the list | युतीमुळे आघाडीचीही यादी लांबणीवर

युतीमुळे आघाडीचीही यादी लांबणीवर

Next

नाशिक : निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात आउटगोइंग झालेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या राज्यव्यापी दौऱ्यात अन्य पक्षातून इनकमिंग होण्यास सुरुवात झाली असून, अन्य पक्षातून येणाऱ्यांची संख्या पाहता त्यातून काहींना विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे युतीचे जागावाटप व उमेदवारांची यादी जाहीर होत नाही तोपर्यंत आघाडीच्या उमेदवारांच्या घोषणा न करण्याच्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील आघाडीच्या इच्छुकांचा धीर सुटूू लागला आहे.
नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे पंधरा मतदारसंघ असून, २००९ च्या आघाडीच्या जागावाटपानुसार यंदाही दोन्ही कॉँग्रेसचे जागावाटप होऊन दोघा पक्षांचे पारंपरिक मतदारसंघांचे वाटप होईल किंवा एखाददुसºया मतदारसंघात फेरबदल केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जागावाटपात दोन्ही कॉँग्रेसमध्ये फारशा कुरबुरी होण्याची शक्यता नसली तरी, आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी आॅगस्टमध्येच यादी जाहीर करण्याची घोषणा केली होती. त्या तयारीचा भाग म्हणून इच्छुकांच्या मुलाखती व मतदारसंघांची चाचपणीही करण्यात आली होती. दोन्ही कॉँग्रेसकडे प्रत्येक मतदारसंघात उमेदवार तयार असतानाही पक्षाकडून यादी जाहीर केली जात नसल्याने इच्छुकांचा धीर सुटू लागला आहे. त्यामुळे काहींनी मुंबईत तळ ठोकला आहे. दोन्ही कॉँग्रेस युतीच्या जागावाटप व उमेदवारांच्या घोषणेच्या प्रतीक्षेत आहे. युतीत उमेदवारीनंतर मोठ्या प्रमाणात आउटगोइंग होऊन त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न आघाडीकडून केला जाणार आहे. त्याची सुरुवातही झाली असून, राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राज्यस्तरीय दौºयात भाजप, सेनेतील अनेक इच्छुकांनी राष्टवादीत प्रवेश केला आहे. आणखी काही वाटेवर असल्याची चर्चा होत आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून, दोन दिवसांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर मतदारसंघात प्रचारासाठी अवघे पंधरा दिवसच मिळणार आहेत. उमेदवारी निश्चित होऊन तशी घोषणा झाली तर इच्छुकांना प्रचारासाठी आणखी वेळ मिळून प्रतिस्पर्ध्यावर मात करता येणे शक्य होणार आहे; मात्र याचा कोणताही विचार वरिष्ठ नेते करीत नसल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे.

Web Title:  The alliance also prolonged the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.