शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

पाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 01:20 IST

मराठवाड्याला पाणी देण्यास भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध केला असून, प्रसंगी सर्वपक्षीय लढा उभारण्याची तयारी केली आहे. जायकवाडीतील वापरण्यायोग्य साठ्यासाठी सात टीएमसी पाण्याची गरज असून, गतवेळचा अनुभव बघता हे पाणी नाशिकमधून सोडले तरी बाष्पीभवनामुळे मराठवाड्यात पोहचणे कठीण आहे. त्यामुळे जायकवाडीच्या मृत पाणी साठ्यातून मराठवाड्याला पाणी द्यावे, अशी मागणीही फरांदे यांनी केली आहे.

नाशिक : मराठवाड्याला पाणी देण्यास भाजपा आमदारदेवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध केला असून, प्रसंगी सर्वपक्षीय लढा उभारण्याची तयारी केली आहे. जायकवाडीतील वापरण्यायोग्य साठ्यासाठी सात टीएमसी पाण्याची गरज असून, गतवेळचा अनुभव बघता हे पाणी नाशिकमधून सोडले तरी बाष्पीभवनामुळे मराठवाड्यात पोहचणे कठीण आहे. त्यामुळे जायकवाडीच्या मृत पाणी साठ्यातून मराठवाड्याला पाणी द्यावे, अशी मागणीही फरांदे यांनी केली आहे.  जायकवाडी धरणातील उपयुक्त साठ्यासाठी पाणी पडत असल्याने मेंढीगिरी समितीच्या शिफारशीनुसार नाशिक आणि नगरमधून पाण्याची मागणी होत आहे. त्यासंदर्भात औरंगाबाद येथे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक झाली आणि १२ टीएमसी पाणी सोडावे, अशी चर्चा करण्यात आली. यासंदर्भात, आमदार फरांदे यांनी पाणी सोडण्यास विरोध केला आहे. मुळातच जायकवाडी धरणाचा मृत पाणी साठा २६ टीएमसी इतका आहे. राज्यातील कोणत्याही धरणाचा इतका मृत साठा नाही. यावर्षी जायकवाडीच्या जलाशयात खरिपाचे पाणी धरून ४३.५ टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. धरणाचा मृत साठ्याचा विचार केला तर धरणात ६९.५ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. ते उद्योग आणि शेतीसाठी मुबलक आहे.परंतु खरीप हंगामातील १६ टीएमसी वापर झाल्याने सध्या ११ टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन असले तरी मुळात गेल्यावर्षी अशाच प्रकारे दहा टीएमसी पाणी नाशिकमधून सोडल्यानंतर ६० टक्के पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने पुरसे पाणी पोहोचले नव्हते त्यामुळे आता तरी सात टीएमसी पाणी जायकवाडीत पोहोचणे शक्य होणार नाही. यामुळे आता मृत साठ्यातील पाणीच वापरावे, अशी मागणी फरांदे यांनी केली आहे.जायकवाडी धरणातून यापूर्वीही गरजेनुसार मृत साठ्यातील पाण्याचा वापर करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर आताही मृत पाणी साठ्याचा वापर करावा, अशी मागणी प्रा. फरांदे यांनी केली आहे. जायकवाडी धरणात मृत साठ्याप्रमाणे कॉरीओव्हर स्टोअरेज नाशिकच्या गंगापूर धरण्यात यावे यासाठी महाराष्टÑ जलसंपत्ती नियमन प्राधीकरणाला प्रा. फरांदे यांनी पत्र दिले आहे.

टॅग्स :WaterपाणीMLAआमदारDevyani Farandeदेवयानी फरांदेgangapur damगंगापूर धरण