शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांनंतर अंदाजपत्रकाला मुहूर्त

By admin | Updated: August 19, 2015 00:05 IST

महापालिका : २५ आॅगस्टला विशेष अंदाजपत्रकीय सभा

नाशिक : महापालिकेच्या सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाला अखेर तब्बल सहा महिन्यांनंतर मुहूर्त लागला असून, येत्या २५ आॅगस्टला सकाळी ११.३० वाजता विशेष अंदाजपत्रकीय सभा आयोजित करण्यात आली आहे. महासभेच्या मंजुरीअभावी अंदाजपत्रक रखडल्याने प्रशासकीय कामकाजात अडथळे उत्पन्न झाले असून, विकास कामांचाही खोळंबा झाला आहे. दरम्यान, एलबीटी रद्द झाल्यामुळे उत्पन्नात होणारी घट लक्षात घेता महासभेकडून अंदाजपत्रकात वाढ सुचविण्याची शक्यता कमी झाली आहे.सन २०१५-१६ या वर्षासाठी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दि. २० फेब्रुवारी रोजी स्थायी समितीचे तत्कालीन सभापती राहुल ढिकले यांना १४३७ कोटी ६७ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. स्थायी समितीवर अंदाजपत्रकावर चर्चा होऊन समितीने अपेक्षेप्रमाणे घरपट्टी व पाणीपट्टीतील दरवाढ फेटाळली होती. त्यानंतर स्थायी समितीकडून महासभेवर अंदाजपत्रक मंजुरीसाठी ठेवणे अपेक्षित असताना त्याला मात्र विलंब झाला. स्थायी समितीचे माजी सभापती राहुल ढिकले व विद्यमान सभापती शिवाजी चुंभळे हे दोघेही नंतर जिल्हा सहकारी बॅँक निवडणुकीत गुंतल्याने अंदाजपत्रक रखडले. त्यामुळे प्रशासनालाही कामकाज करताना अडचणी उत्पन्न होऊ लागल्या. विकासकामांचा खोळंबा झाला. मागील महिन्यात आयुक्तांनी तर स्थायी समितीच्या बैठकीतच अंदाजपत्रक तातडीने महासभेवर मंजुरीसाठी ठेवण्याची विनंती स्थायीला केली होती. त्यानुसार, स्थायी समितीने २०-२५ दिवसांपूर्वी अंदाजपत्रकात ३३२ कोटी ३० लाख रुपयांची वाढ सुचवत १७६९ कोटी ९७ लाख रुपयांचे प्रारूप अंदाजपत्रक प्रशासनाकडे पाठविले. आता तब्बल सहा महिन्यांनंतर महापौरांनी येत्या २५ आॅगस्टला विशेष अंदाजपत्रकीय सभा बोलाविली आहे. (प्रतिनिधी)