शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
4
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
5
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
6
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
7
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
8
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
9
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
10
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
11
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
12
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
13
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
14
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
15
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
16
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
17
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
18
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
19
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
20
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
Daily Top 2Weekly Top 5

१२ वाजेनंतरही वाजणार भोंगा

By admin | Updated: September 6, 2016 01:01 IST

शासनाचा अध्यादेश : वर्षातील १५ दिवस रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपकांना परवानगी

 नाशिक : ध्वनिप्रदूषणाच्या नियमानुसार बंदिस्त ठिकाणे वगळता सार्वजनिक ठिकाणी रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक लावण्यास परवानगी नव्हती़ या नियमावलीत महाराष्ट्र सरकारने सोमवारी (दि़५) बदल केल्याचा अध्यादेश काढला असून, त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम व धार्मिक सणांकरिता वर्षभरातून पंधरा दिवस रात्री दहा ऐवजी बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करता येणार आहे़ हे पंधरा दिवस कोणते असावेत याची जबाबदारी राज्य शासनाकडे असणार आहे़दरम्यान, शांतता क्षेत्रात ही सूट लागू नसल्याने याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व ध्वनिप्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाची असणार आहे़ केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमान्वये ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर श्रोतृगृहे, सभागृहे व सामूहिक सभागृहे व मेजवानी कक्ष यांसारख्या बंद ठिकाणांव्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणी रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत करता येत नाही़ या नियमामध्ये ११ आॅक्टोबर २००२ च्या अधिसूचनेद्वारे केंद्र शासनाने सुधारणा केली असून नियम ५ मध्ये उपनियम (३) चा नव्याने समावेश करण्यात आला आहे़ त्यानुसार ध्वनिप्रदूषणाची पातळी विहित मर्यादेत राखून वर्षभरामध्ये १५ दिवस ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर बंदिस्त ठिकाणे वगळता सार्वजनिक ठिकाणी रात्री १० ऐवजी १२ पर्यंत सांस्कृतिक व धार्मिक सणांकरिता करता येणार आहे़ ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकासाठीच्या मर्यादेसाठी कोणते पंधरा दिवस ठेवावेत, याची जबाबदारी राज्य शासनाची आहे़ याबाबत दाखल असलेल्या जनहित याचिकेत उच्च न्यायालयाने १६ आॅगस्टला २०१६ रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सरकारने हा अध्यादेश काढला असून, ध्वनीची विहित मर्यादा राखून वर्षभरातील पंधरा दिवस सकाळी सहा ते रात्री वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करता येणार आहे़ महाराष्ट्र शासनाने काढलेला या अध्यादेशावर पर्यावरण संचालक डॉ़ बी़ एऩ पाटील यांची स्वाक्षरी आहे़ (प्रतिनिधी)