शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
3
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
4
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
5
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
6
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
7
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
8
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
9
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
10
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
12
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
13
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
14
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
15
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
16
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
17
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
18
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावरच केजरीवाल यांना अटक का? सर्वोच्च न्यायालयाची ईडीला विचारणा; म्हणाले...
20
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 

टेम्पो-रिक्षाचा भीषण अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:19 AM

सिन्नर येथील नाशिक-पुणे महामार्गावरील आडवा फाटा भागात भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीसह रिक्षाला पाठीमागून जबर धडक दिली. यात रिक्षाने अचानक पेट घेतला. या अपघातात रिक्षातील प्रवासी महिला भाजून ठार झाली, तर रिक्षासह दुचाकीवरील सात ते आठ जण जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देरिक्षाने घेतला पेट; महिला ठार, चार जखमी

सिन्नर : येथील नाशिक-पुणे महामार्गावरील आडवा फाटा भागात भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीसह रिक्षाला पाठीमागून जबर धडक दिली. यात रिक्षाने अचानक पेट घेतला. या अपघातात रिक्षातील प्रवासी महिला भाजून ठार झाली, तर रिक्षासह दुचाकीवरील सात ते आठ जण जखमी झाले आहेत. शनिवारी (दि. १४) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.सरोजाबाई सुखलाल परदेशी (६५) असे मृत महिलेचे नाव आहे. येथील उद्योगभवन परिसरातील मेंगाळ मळ्यातील भीमाबाई द्वारकानाथ मेंगाळ (६०), सुनील द्वारकानाथ मेंगाळ (२७) यांच्यासह अक्षय पाल (२५) व अर्जुन साहू हे परप्रांतीय कामगार जखमी झाले असून, त्यांच्यावर यशवंत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे दाखल केले आहेत.नाशिकहून सिन्नरच्या दिशेने येणाºया आयशर टेम्पोने (क्र. एमएच १४ एचजी १३९९) दुचाकीसह रिक्षाला (क्र. एमएच १५ एफ. यू. ३९५०) जोरदार धडक दिली. वेगामुळे टेम्पो नियंत्रित न झाल्याने रिक्षाला १०० ते १५० फूट फरफटत नेले. यात रिक्षाचा मागील भागाचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. अपघातात रिक्षाची पेट्रोल टाकी फुटल्याने रिक्षाने पेट घेतला. त्यामुळे आगीचा भडका उडल्याने प्रवाशांपैकी सरोजबाई भाजल्या गेल्या. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. रिक्षाचालकही जखमी झाला आहे. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील हे तपास करीत आहेत.आग विझविण्याचा प्रयत्नअपघातानंतर टेम्पोचालक वाहन सोडून पसार झाला. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, सहायक निरीक्षक राजेंद्र रसेडे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन बंब येईपर्यंत मे. शंकरराव बाळाजी वाजे पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन प्रतिबंधक सिलिंडरद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न केला. सिन्नर नगर परिषद व एमआयडीसीचे अग्निशमन बंबही दाखल झाल्याने रिक्षाची आग आटोक्यात आली. स्थानिकांनी रिक्षा तोडून प्रवाशांना बाहेर काढले.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात