येवल्यात अपघात; डंपरला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 01:08 AM2021-03-20T01:08:22+5:302021-03-20T01:08:51+5:30

येवला शहरातील कोपरगाव महामार्गावर दोन डंपरच्या विचित्र अपघातात एका डंपरला आग लागल्याने मोठी वित्त हानी झाली आहे.

Accident in Yeola; Dumper fire | येवल्यात अपघात; डंपरला आग

येवल्यात अपघात; डंपरला आग

googlenewsNext

येवला : शहरातील कोपरगाव महामार्गावर दोन डंपरच्या विचित्र अपघातात एका डंपरला आग लागल्याने मोठी वित्त हानी झाली आहे.
तहसील कार्यालय जवळ असणाऱ्या गतीरोधकावर  मनमाडच्या दिशेने जात असलेल्या दोन डंपरपैकी पुढे असलेल्या डंपरनेअचानपणे ब्रेक दाबल्याने पाठीमागून येत असलेला डंपरवर (क्रमांक एमएच १२ क्यूजी ११४९) आदळला. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी पाठीमागील डंपरला आग लागल्यानं संपूर्ण डंपर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या अपघातामुळे काही काळ नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सदर घटना शुक्रवारी, (दि. १९) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली.  
दरम्यान घटनेची माहिती मिळताच रात्र गस्तीवर असलेले पोलिस कर्मचारी विजय पैठणकर  यांनी तात्काळ  अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न करत आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत डंपर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. आग विझवण्यासाठी पोलिस कर्मचार्‍यांसह  पेट्रोल पंप कर्मचार्‍यांची मदत झाली.

Web Title: Accident in Yeola; Dumper fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.