मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर दोन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 13:17 IST2019-04-11T12:22:38+5:302019-04-11T13:17:05+5:30
मुंबई-नाशिक महामार्गावर गुरुवारी (11 एप्रिल) सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर दोन जण जखमी
कसारा/ भातसानगर - मुंबई-नाशिक महामार्गावर गुरुवारी (11 एप्रिल) सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-नाशिक महामार्गावरील पेंढरघोळ दरम्यान गुरुवारी सकाळी सव्वा आठच्या दरम्यान नाशिकहून मुंबईकडे जाणारा आयशर टेम्पो वेगाने जात असताना गाडीचा एक्सल तुटल्याने डिव्हायडरवरून थेट मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या ट्रेलरवर येऊन धडकला. वाहनात चार किलोमीटर अंतरावरील रातांधळे या गावातील तीन प्रवाशी बसले होते. त्यामध्ये सुजाता वाझे (25) मिनका अशोक वाझे (27) या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर आयशर टेम्पोच्या चालक नवनाथ तुकाराम देवकर (35) रा.नांदगाव नाशिक अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातात ट्रेलरचा चालक अर्जुन भैरू भोसले (45) रा. सांगली आणि सूरज राजू घाटाळ (16) रा .खोडाळा हे दोन जण जखमी झाले आहेत.
अपघातात ट्रेलर चालकाची कमाल म्हणावी लागेल ज्याने आपला ट्रेलर थेट रेल्वे लाइनवर न जाऊ देता तो झाडांच्या मधून थेट टेकडावर चढवल्याने मोठा रेल्वे अपघात टळला आहे. हा ट्रेलर बाजूला करण्यासाठी मात्र रेल्वेला मेगा ब्लॉक घेऊन मोठी कसरत करावी लागेल जेणे करून तो टेकडावरील ट्रेलर रेल्वेच्या रुळावर पडणार नाही. या अपघातातील मृत्यू झालेल्या दोन्ही महिला या रोजगारासाठी आठगाव येथील कंपनीत कामाला येत होत्या.