शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
4
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
5
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
6
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
7
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
8
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
9
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
10
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
11
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
12
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
13
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
14
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
15
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
16
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
17
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
18
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
19
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
20
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकास अधिकाऱ्यास शिवीगाळ

By admin | Updated: October 21, 2015 22:58 IST

विंचूर : कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; पोलीस चौकीवर मोर्चा

विंचूर : येथील ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामपालिकेच्या कर्मचाऱ्यांना गावातील इसमाने शिवीगाळ केल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी जी. टी. खैरनार दीर्घ मुदतीच्या रजेवर गेले आहेत, तर ग्रामपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारल्याने गावातील साफसफाई, पाणीपुरवठा यांसह ग्रामपालिकेचे कामकाज ठप्प झाल्याने ग्रामपालिकेचे सदस्य व कर्मचारऱ्यांसह ग्रामस्थांनी संबंधित इसमावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करीत येथील पोलीस औटपोस्टवर मोर्चा काढला. संबंधित इसमावर गुन्हा दाखल झाल्याने दुपारनंतर आंदोलनमागे घेण्यात आले.मंगळवारी ग्रामविकास अधिकारी जी.टी. खैरनार हे लासलगाव पोलीस ठाण्यÞाचे सहायक पोलीस निरीक्षक सानप यांच्या सांगण्यावरून साळुंके यांच्या घराबाहेरील कचरा भरावयास ग्रामपालिकेच्या कर्मचाऱ्यांसह गेले असता, संबंधित इसमाने खैरनार यांना शिवीगाळ केली. तसेच दगड घेऊन खैरनार यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. संबंधित इसमाने यापूर्वीही ग्रामपालिकेच्या कामात अडथळा आणणे, अधिकारी, पदाधिकारी यांना शिवीगाळ करणे तसच अंगावर रॉकेल घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यावर आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सदर इसम फक्त पोलीस स्टेशनच्या हिमतीवरच अशा प्रकारचे कृत्य करीत असून, संपूर्ण गावाला वेठीस धरले आहे, असा आरोप करीत ग्रामविकास अधिकारी बुधवारपासून दीर्घ मुदतीच्या रजेवर गेले तर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. सदस्यांसह कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतपासून पोलीस औटपोस्टवर मोर्चा काढला. ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करीत संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सहायक पोलीस निरीक्षक आर. बी. सानप यांनी विंचूर येथे येऊन संबंधित इसमावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सांगून संबंधितास लासलगाव पोलीस ठाण्यात घेऊन गेले. दरम्यान, दुपारी संबंधित इसमावर सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर आंदोलन मागे घेतले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पवार, पंचायत समिती सदस्य राजाराम दरेकर, शकुंतला दरेकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तीन वर्षे : बंद असलेले मंदिर केले खुले संबंधित इसमाने येथील न्हावी समाजाचे मंदिर तीन वर्षांपासून बंद करून ठेवले होते. बुधवारी ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थित मंदिराचे कुलूप तोडण्यात आले. श्रीफळ वाढवून समाजासाठी मंदिर खुले करण्यात आल्याने समाजबांधवांनी समाधान व्यक्त केले. ग्रामपंचायत प्रशासनाकडून तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर बाळकृष्ण चव्हाण, राजेंद्र शिंदे, श्याम चव्हाण, मनोज चव्हाण, सुरेश काळे, रामदास जाधव, मयूर जाधव, तुकाराम जाधव आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.