शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

आधाराश्रमात दानशूरांची रीघ

By admin | Updated: November 12, 2015 00:11 IST

आशेची पणती प्रज्वलित : निराधार बालकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

नाशिक : दीपावलीचा सण सर्वांच्या आनंदाचा अन् उत्साहाचा. या आनंदात प्रत्येकाला सहभागी होता यावे, यासाठी आज बहुतांश दानशूर व्यक्ती व संस्थांनी अशोकस्तंभावरील आधाराश्रम गाठले. येणाऱ्या प्रत्येकाने त्या निरागस बालकांना मोठ्या प्रेमाने दिवाळीचा फराळ भरविला आणि नवीन कपडेही दिले. यामुळे बालगोपाळांना ‘दिवाळी’ला मोठा ‘आधार’ मिळाला.या धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगातदेखील सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवणारे अनेक सहृदयी माणसे मोठ्या संख्येने आहे. आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाचे काही देणं लागतो, या विचाराने प्रेरित होऊन अनेकांनी आधाराश्रमाचा उंबरा ओलांडला आणि निरागस बालकांसमवेत दिवाळी साजरी केली. यामध्ये काही कुटुंबांबरोबरच सामाजिक संस्था, मित्रमंडळांचाही सहभाग होता.दीपावलीचा उत्साह शहरात सर्वत्र शिगेला पोहचला असताना गरजू घटकांमध्ये मोडणाऱ्या आधाराश्रमातील बाळगोपाळांनाही दिवाळी तितक्याच उत्साहाने व आनंदात साजरी करता यावी, यासाठी शहरातील बहुतांश संवदेनशील मनाची दानशूर माणसे बुधवारी (दि. ११) सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आधाराश्रमात दाखल होत होती. विशेष म्हणजे येणारा प्रत्येक नागरिक फराळाचे भरगच्च पदार्थ, नवीन कपडे, पादत्राणे, मिठाईचे पुडे, शोभेचे फटाके घेऊन येत होता. यामुळे आधाराश्रमात सकाळपासूनच ‘दिवाळी सेलिब्रेशन’ला सुरुवात झाली होती. नागरिकांच्या वर्दळीमुळे आधाराश्रमात जणू दिवाळीचा सामूहिक सोहळा साजरा केला जात असल्याचे चित्र निर्माण झाले होते. नियतीने जरी आई-वडिलांचे छत्र हिरावून घेतले असले तरी या प्रकाशाच्या उत्सवात बाळगोपाळांच्या आशेची पणती तेवत होती हे त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य सहज सांगून जात होते. आपल्या आयुष्यातही एक ना एक दिवस प्रकाशकिरण पडेल, असा आशावाद घेऊन काही मोठी मुले मोठ्या उत्साहाने आधाराश्रमाच्या उंबरठ्यावर पणत्या प्रज्वलित करत होते. (प्रतिनिधी)