शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक-पुणे महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बस पुलावरून कोसळली; एक ठार, 34 जखमी

By धनंजय वाखारे | Updated: April 14, 2024 10:10 IST

महाकाली ट्रॅव्हल्सची खाजगी आराम बस पुण्याहून नाशिककडे जात असताना पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. 

- सचिन सांगळे

नांदूरशिंगोटे : नाशिक पुणे महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथील पुलावरून महाकाली ट्रॅव्हल्सची खाजगी आराम बस (एम एच 14 सीडब्ल्यू 9072) खाली कोसळून अपघात झाला. या अपघातामध्ये एक प्रवासी ठार तर 34 जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती वावी पोलिसांनी दिली आहे. महाकाली ट्रॅव्हल्सची खाजगी आराम बस पुण्याहून नाशिककडे जात असताना पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. 

जखमी रुग्णांना त्वरीत सिन्नर येथील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, पोलीस उपनिरीक्षक देविदास लाड, नितीन कदम तसेच अन्य सहकारी आणि महामार्ग पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच अपघात झाल्यानंतर दहा मिनिटातच नांदूरशिंगोटे व सिन्नर येथील रुग्णवाहिका तातडीने दाखल होत स्थानिक ग्रामस्थ व पोलीस यांच्या मदतीने जखमींना बाहेर काढत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान अपघातात मृत झालेल्या प्रवाशाचे नाव कश्यप मुकेशभाई पाठक (35) रा. अहमदाबाद, गुजरात येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

जखमी प्रवाशांची नावेअब्दुल रज्जाक, सोनाली शेजवळ, मालता शेजवळ, सुंधी सोनी, अशरीध रेड्डी, प्रकाश कौटि, प्रियंका आलेवर, पवन पांचाळ, शुभम जाधव, भगवान इंगळे, अनिल निकमले, मुकेश सोळंकी, शिवाजी नालेकर, राणी कांची, अमित पांचाळ, निखिल कांडेकोरी, प्रियांशु अलवार, महेश बिडवे, तुषार मिस्त्री, पवन पावरा, राधेश्याम पावरा, रितेश भिल, बशीर चेतन सूर्यवंशी, सुरेश वाघेला मोहम्मद अली, मेहुल प्रजापती, सोनम पवार, विवेक मिस्त्री यांचा समावेश आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात