राज्यातील ९६ वर्ग-१ अधिकाऱ्यांना पदोन्नती

By Admin | Updated: August 1, 2014 01:11 IST2014-07-31T23:19:05+5:302014-08-01T01:11:02+5:30

राज्यातील ९६ वर्ग-१ अधिकाऱ्यांना पदोन्नती

9 6-class -1 officials in the state promotions | राज्यातील ९६ वर्ग-१ अधिकाऱ्यांना पदोन्नती

राज्यातील ९६ वर्ग-१ अधिकाऱ्यांना पदोन्नती

नाशिक : महाराष्ट्र विकास सेवा गट-अ मधील उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गटविकास अधिकारी पदावरील तदर्थ पदोन्नतीची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यातील ९६ अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून, नाशिक विभागातील सहा अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे.
रिक्त असलेल्या बागलाण गटविकास अधिकारीपदी दहीवडी (सातारा) येथील सहायक गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नांदगावचे बालविकास प्रकल्प अधिकारी ए. व्ही. पटाईत यांची नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हा कार्यक्रम समन्वयकपदी पदोन्नती झाली आहे. त्याचप्रमाणे दिंडोरीचे सहायक गटविकास अधिकारी सी. आर. भावसार यांची यवतमाळ जिल्हा परिषदेच्या उपजिल्हा कार्यक्रम समन्वयकपदी बदली झाली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सहायक प्रकल्प अधिकारी सी. टी. येवला यांची गडचिरोली जिल्हा परिषदेच्या उपजिल्हा कार्यक्रम समन्वयकपदी बदली झाली आहे. त्याचप्रमाणे सुरगाणा तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी एम. व्ही. मुरकुटे यांची पातूर (अकोला) पंचायत समिती गटविकास अधिकारीपदी, तर विभागीय आयुक्त कार्यालयातील सहायक गटविकास अधिकारी जे. एन. आभाळे यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) पदी पदोन्नती झाली आहे. पदोन्नती मिळालेल्या राज्यातील ९६ अधिकाऱ्यांचा पदोन्नतीच्या कार्यवाहीत समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 9 6-class -1 officials in the state promotions